

सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. त्यातच राज्यातल्या बचत गटातल्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने यावर्षी बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्जवाटपाटचं उद्दिष्ठ दिलं असून, त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातल्या बचत गटातल्या महिलांना तब्बल ६१५ कोटी रुपयांचं बँक कर्ज मिळणार आहे. हे कर्ज वार्षिक ७ ते १२ टक्के व्याजदराने दिलं जाईल.
राज्यात सध्या अडीच लाखांपेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत. आता त्यांच्याशी दोन कोटींपेक्षा जास्त महिल्या जोडलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात 'उमेद' आणि 'महिला आर्थिक विकास महामंडळ' यांच्या माध्यमातून सध्या २५ हजार बचत गट कार्यरत आहेत. याशिवाय आणखी १७ हजार नवीन बचत गट स्थापन करण्याचं नियोजन आहे. त्यामध्ये पावणेदोन लाख महिलांचा समावेश होणार आहे.
बचत गट स्थापन करण्यासाठी दहा महिलांचा १ गट असणं गरजेचं आहे. गटाची नोंदणी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ३० हजार रुपये म्हणजेच एकूण ६० हजार रुपयांचे खेळते भांडलवल दिले दाते. ही रक्कम परत करण्याची गरज नसते. ही रक्कम बचत गटाच्या कामकाजासाठी वापरताही येते. गटाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला ६० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते आणि पुढे गटाच्या कामगिरीनुसार ही कर्जाची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.
तसेच उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने बँकांकडूनही मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलं जाणार आहे. तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ७ टक्के तर तीन लाखांवरच्या कर्जावर १२ टक्क्यांपर्यंत व्याजदर लागू राहणार आहे.
या योजनेमुळे अनेक महिलांना लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, गृहउद्योग आणि स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.