

बीएसएनएलचा ग्राहकांसाठी नवीन प्लॅन
१ रुपयांत नवीन सिम ऑफर
३० दिवस फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस
दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री
महागड्या रिचार्जमुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त रिचार्ज प्लान आणला आहे. फक्त १ रुपयांमध्ये तुम्हाला नवीन सिमकार्ड आणि ३० दिवसांचा मोफत डेटा आणि कॉलिंग मिळत आहे. त्यामुळे तुम्ही देखील बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड खरेदी करून याचा फायदा घेऊ शकता.
बीएसएनएल कंपनीने एक अशी ऑफर आणली आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त १ रुपयामध्ये नवीन सिम खरेदी करू शकता. या सिमसोबत तुम्हाला महिनाभर मोफत कॉलिंग, एसएमएस आणि इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. बीएसएनएल कंपनीचा हा फ्रीडम प्लॅन आहे. हा प्लॅन नेमका काय आहे यात काय काय सुविधा मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
बीएसएनएल फ्रीडम प्लॅनअंतर्गत, नवीन सिम खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ रुपया द्यावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३० दिवसांची वैधता आणि अनेक फायदे मिळणार आहेत. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त १ रुपया खर्च करावा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला नवीन सिमकार्ड तर मिळेलच पण कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तुम्हाला ३० दिवस मोफत सेवा मिळणार आहे.
१ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल्स, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस सुविधा मिळणार आहे. आजच तुम्ही रिटेल स्टोअरला किंवा सीएससीला भेट देऊन या ऑफरचा फायदा घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे या प्लॅनअंतर्गत तुम्ही देशभरात कोणत्याही नेटवर्कवर मोफत बोलू शकणार आहात. त्याचसोबत कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला १०० फ्रीमध्ये एसएमएस करता येणार आहेत.
बीएसएनएल कंपनीचा हा ऑफर प्लॅन फक्त ३० एप्रिल २०२६ पर्यंतच उपलब्ध असणार आहे. त्यानंतर कंपनी ही ऑफर बंद करून शकते किंवा तिची किंमत वाढवू शकते. त्यामुळे ३० एप्रिलच्या आधीच या ऑफरचा फायदा घ्या. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नजीकच्या ऑफलाइन स्टोअरला भेट द्यावी लागेल. ही ऑफर ऑनलाइन उपलब्ध नाही. तुमच्या जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राला किंवा कोणत्याही अधिकृत विक्रेत्याला भेट द्या. नवीन सिम मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र सोबत आणावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.