बँकेत काम करणाऱ्यांसाठी येणार 'अच्छे दिन'; मिळेल २ दिवस सुट्टी, काय आहे नवा नियम

5 Day Work For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत
बँकेत काम करणाऱ्यांसाठी येणार 'अच्छे दिन'; मिळेल २ दिवस सुट्टी, काय आहे नवा नियम
Bank Employee
Published On

बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांना फक्त पाच दिवस काम करावं लागणार आहे, तुम्ही जे वाचत आहात ते बरोबर वाचत आहात. लवकरच बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला जाणार आहे. तसेच दोन दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या सुट्टीची मागणी करत होते. त्यांना शनिवारी आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणीवर सरकार सकारात्मक विचार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात पाच दिवस काम करण्याबाबत एकमत झालंय. सरकारही या निर्णयाला मान्यता देऊ शकते. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला दोन सु्ट्टीचा हा नियम लागू होऊ शकतो. इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दोन दिवस सुट्टी मिळेल.

बँकेत काम करणाऱ्यांसाठी येणार 'अच्छे दिन'; मिळेल २ दिवस सुट्टी, काय आहे नवा नियम
Success Story: CAT परीक्षेत ९९ टक्के, लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, जिद्दीवर IAS झाली; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा...

इंडियन बँक्स कॉन्फेडरेशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यातील कराराला एक वर्ष पूर्ण होत आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेची (RBI) मान्यता घेणे आवश्यक आहे. सरकारनं या नियमाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली तर बँक बंद होण्याच्या आणि उघडण्याच्या वेळेतही बदल होणार आहे. सर्व बँका सकाळी १० वाजता उघडतात आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होतात. तर नवीन नियमानुसार बँकेच्या कर्मचाऱ्यांना सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत काम करावं लागेल.

बँकेत काम करणाऱ्यांसाठी येणार 'अच्छे दिन'; मिळेल २ दिवस सुट्टी, काय आहे नवा नियम
PF Withdraw : पीएफ खात्यातून पैसे काढणे आणखी सोपे; फक्त 'या' ५ स्टेप्स करा फॉलो

बँक संघटना २०१५ पासूनच दर शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्याची मागणी करत होत्या. दरम्यान २०१५ मध्ये झालेल्या दहाव्या द्विपक्षीय करारानुसार आरबीआय आणि सरकारनं आयबीएसह दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी म्हणून निश्चित केला होता. आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त ५ दिवस काम करावे लागेल.

पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत ७५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालीय. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com