August Month Holiday: फिरायला जायचा प्लान करताय? ऑगस्ट महिना ठरेल बेस्ट;दोन लाँग वीकेंड अन् ५ दिवस सलग सुट्ट्या मिळणार

August Month Holiday List: ऑगस्ट महिना हा फिरायला जाण्यासाठी बेस्ट महिना ठरु शकतो. ऑगस्ट महिन्यात दोन लाँग वीकेंड आहेत. त्यात एका वीकेंडला सलग ५ दिवस सुट्टी तुम्हाला मिळू शकते.
August Month Holiday
August Month HolidaySaam Tv
Published On

ऑगस्ट महिना लवकरच सुरु होणार आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत. ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन या सणांना सुट्ट्या असतात. या महिन्यात कर्मचाऱ्यांना अनेक सुट्ट्या मिळतात. जर तुम्हीही सुट्ट्यांची वाट पाहत असाल आणि फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. ऑगस्ट महिन्यात दोन लाँग वीकेंड आहे. या वीकेंडला तुम्हाला ५दिवसांची सुट्टी मिळू शकते. ही सुट्टी कशी मिळणार आहे ते जाणून घ्या.

August Month Holiday
Gold-Silver Rate Fall : पुढच्या वर्षी सोनं १ लाख रुपये तोळा होण्याची शक्यता; वाचा आजचा भाव घसरला की वाढला!

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टी ही असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात दोन लाँग वीकेंड आहेत. १५ ऑगस्टला सर्वांना सुट्टी असते. यावर्षी १५ ऑगस्टला गुरुवार आहे. त्यामुळे गुरुवारी सुट्टी, शुक्रवारी तुम्ही रजा घेऊ शकता. त्यानंतर शनिवार आणि रविवार वीकेंड आहे. त्यानंतर पुन्हा सोमवार १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनानिमित्त अनेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असतात. त्यामुळे तुम्हाला ५ दिवसांचा लाँग वीकेंड एन्जॉय करता येईल.

लाँग वीकेंडची लिस्ट

१५ ऑगस्ट गुरुवार- स्वातंत्र्य दिनाची सुट्टी

१६ ऑगस्ट शुक्रवार- तुम्ही सुट्टी घेऊ शकतात

१७ ऑगस्ट शनिवार- वीकेंड

१८ ऑगस्ट रविवार- कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी

१९ ऑगस्ट सोमवार- रक्षाबंधन सुट्टी

August Month Holiday
Second hand EV: जुनी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणं पडू शकतं महाग; या 5 गोष्टी जाणून घ्या, फायद्यात राहाल!

ऑगस्ट महिन्यात आणखी तीन दिवस सलग सुट्ट्या मिळणार आहे. या महिन्यात २४ ऑगस्टला शनिवारी, २५ ऑगस्टला रविवार आहे तर २६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. त्यामुळे तुम्हाला सुट्टी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही नक्कीच फिरायला जायचा प्लान करु शकतात.

August Month Holiday
Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com