आता ATM मधून मिळणार १०,२० आणि ५० रुपयांच्या नोटा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Hybrid ATM Changes: आता एटीएममधून तुम्ही १०,२० आणि ५० रुपयांच्या नोटादेखील काढू शकणार आहात. सरकारने हायब्रिड एटीएमचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे.
ATM
ATM Saam tv
Published On
Summary

आता एटीएममधून काढता येणा १०,२० आणि ५० च्या नोटा

हायब्रिड एटीएमचा पायलट प्रोजेक्ट सुरु

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सध्या सर्वकाही ऑनलाइन झालं आहे. डिजिटल पेमेंट होतात. मात्र, अनेकदा काही कामांसाठी रोख रक्कम ही गरजेची असते. रोख रक्कम ही एटीएममधून काढली जाते. दरम्यान, सध्या एटीएममधून १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा येतात. परंतु अनेकदा आपल्याला सुट्टे पैसे हवे असतात. परंतु एटीएममधून १०,२० , ५० रुपयांच्या नोटा नसल्याने अनेक अडचणी येतात. दरम्यान, आता सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

ATM
EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

आता एटीएममधून पैसे काढण्यामध्ये बदल केला जाणार आहे. सरकार आता कमी किंमतीच्या नोटांची उपलब्धता वाढवणार आहे. यासाठी नवीन तांत्रिक उपाय विकसित करत आहे. सरकार हायब्रिड एटीएम बसवण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा काढू शकतात. या एटीएममधून तुम्हाला तुम्हाला हव्या तशा लहान रुपयांच्या नोटा काढू शकतात.

पायलट प्रोजेक्ट सुरु

एटीएमचा हा पायलट प्रोजेक्ट मुंबईत सुरु करण्यात आले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हे एटीएम अशा ठिकाणी बसवले जाणार आहे जिथे रोख रक्कम जास्त प्रमाणात वापरली जाते. बाजारपेठ, रेल्वे स्थानक, बस स्टँड या ठिकाणी हे एटीएम उघडले जाणार आहेत.

ATM
EPFO 3.0: कामाची बातमी! आता ATM मधून काढता येणार पीएफचे पैसे; या दिवसापासून सुरु होणार सेवा

सध्या सर्वकाही जरी डिजिटल झाले असले तरी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जास्त प्रमाणात रोख व्यव्हार करतात. रोजंदारीवर काम करणारे लोक, दुकानदार, ऑटो चालक या लोकांना सुट्टे पैसे द्यावे लागतात.

आरबीआयची भूमिका

या नवीन एटीएमच्या योजनेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या हायब्रिड एटीएममध्ये रोख रक्कम संपू नये म्हणून लहान नोटांची छपाई वाढवण्याचा विचारत करत आहे. रोख रक्कम जास्त प्रमाणात उपलब्ध करुन देणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

ATM
SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com