SBI ATM Charges: स्टेट बँकेचा ग्राहकांना झटका! ATM मधून पैसे काढणे आता महागलं; वाचा सविस्तर

SBI ATM Card Charges Increases: स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आगहे. स्टेट बँकेने आता एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
SBI ATM Charges
SBI ATM ChargesSaamTv
Published On
Summary

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

SBI च्या एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढले

बँकेच्या ग्राहकांना फटका

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला आता फटका बसणार आहे. स्टेट बँकेने आपल्या ATM ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवले आहेत. यामुळे आता एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळेच सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

SBI ATM Charges
EPFO Update: EPFO चा मोठा निर्णय! या PF खातेधारकांना KYC अनिवार्य; अन्यथा अकाउंट होणार बंद

SBI च्या एटीएम चार्जेसमध्ये वाढ (SBI ATM Charges Increases)

स्टेट बँकेने याआधी १ फेब्रुवारी २०२५ मध्ये एटीएम कार्डच्या चार्जेसमध्ये बदल केला होता. त्यानंतर वर्षभरातनंतर पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन फीमध्ये बदल केला आहे. बँकेच्या म्हणण्यांनुसार इंटरचेंज फी वाढल्यामुळे हे चार्जेसदेखील वाढले आहे. यामध्ये ऑटोमेडेट टेलर मशीन म्हणजे एटीएम आणि विड्रॉल मशीनच्या ट्रान्झॅक्शनच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे.

किती चार्ज वाढले?

जर सेव्हिंग अकाउंट असेल तर त्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शन मिळत होते. मात्र आता ही लिमिट महिन्याला १० ट्रान्झॅक्शन करण्यात आली आहे. यानंतर १० ट्रान्झॅक्शनची लिमिट ओलांडल्यानंतर तु्म्हाला २३ रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. पहिल्या महिन्यात हे मोफत असणार आहे. नॉन फायनान्शियर ट्रान्झॅक्शनवर ११ रुपये आणि जीएसटी लागणार आहे.

SBI ATM Charges
SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

स्टेट बँकेने सांगितले की, याआधी १ फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचे ट्रान्झॅक्शन सर्व्हिस चार्ज रिवाइज केले होते. यानंतर आता ATM/ADWM साठी इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे नवीन चार्ज १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. यामध्ये नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन १० रुपयांवरुन ११ रुपये आणि जीएसटी करण्यात आले आहेत.यामध्ये १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

SBI ATM Charges
PIB Fact Check: SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! Aadhaar अपडेट करा अन्यथा खातं होणार बंद; वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com