अंबानींवर ED ची मोठी कारवाई! तब्बल ५१० कोटींच्या मालमत्तेवर टाच; २ खासगी विमानेही जप्त

Anil Ambani Money Laundering Case : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित प्रकरणात ईडीने ५१० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात एम्ब्रायर लेगसी ६५० आणि डसॉल्ट फाल्कन २००० या दोन खासगी विमानांसह फ्लॅट, जमीन, पवनचक्क्या, बँक ठेवी आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.
Anil Ambani ED probe
Anil Ambani ED probe
Published On: 

ED Raid on Reliance Group : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात ED ने अनिल अंबानींच्या ग्रुपची तब्बल ५१० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये २ खासगी विमानांचाही समावेश आहे. बँकेतील घोटाळे आणि निधीच्या गैरवापराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (Anil Ambani Money Laundering Case)

भारतातून परदेशातील टॅक्समध्ये पैशांची हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे ईडीने अनिल अंबानी यांच्यावर धडक कारवाई केली. ईडीच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेल्यामध्ये एम्ब्रायर लेगसी ६५० आणि डसॉल्ट फाल्कन २००० ही २ खासगी विमाने, ६ फ्लॅट, जमीन, पवनचक्क्या, बँक ठेवी आणि गुंतवणुकीचा समावेश आहे. या नव्या जप्तीमुळे अनिल अंबानी ग्रुपची आतापर्यंत जप्त केलेली एकूण मालमत्ता २३,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ईडीने मंगळवारी ही माहिती दिली.

Anil Ambani ED probe
खासदार श्याम बर्वे यांच्यासोबतच्या व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रतिभा धानोरकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या....

ईडीच्या तपासात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) यांच्याशी संबंधित २६३.०५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याशिवाय रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची २४७.१२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

आरकॉम (RCom) प्रकरणाच्या कारवाईत ईडीने महाराष्ट्रातील दोन चार्टर्ड विमाने, सहा भूखंड आणि कार्यालयीन परिसर जप्त केला आहे. यामध्ये डसॉल्ट फाल्कन २००० आणि एम्ब्रेर या विमानांचा समावेश आहे. तसेच आरएचएफएल आणि आरसीएफएल प्रकरणांमध्ये, तामिळनाडूतील दोन पवनचक्की, बँक खात्यांमधील ठेवी, मुदत ठेवी (FD) आणि इतर गुंतवणूक ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने संपर्क साधला असता, अनिल अंबानी यांच्या समूहाच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला.

Anil Ambani ED probe
ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार हरपला; माजी जिल्हाप्रमुखाचं अल्पशा आजाराने निधन, शिवसैनिकांमध्ये शोककळा

सीबीआय (CBI) आणि दिल्ली तसेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या (FIR) आधारावर हा मनी लाँड्रिंगचा तपास सुरू करण्यात आला होता. तसेच, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्यांतर्गत (FEMA) ईडीकडून इतर दोन स्वतंत्र प्रकरणांचाही तपास केला जात आहे. दरम्यान, या तपासाच्या फेऱ्यात रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपन्यांचा समावेश असल्याचे ईडीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.