
मुंबई : भारताच्या आतिथ्य क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. आतिथ्य क्षेत्रातील कंपनी एकॉर आणि पर्यटन समूह इंटरग्लोब यांनी भागीदारीची घोषणा केली आहे. बेजोड नेटवर्क, ब्रॅंड्सचा एक पोर्टफोलियो आणि सर्व मार्केट सेगमेन्ट्समध्ये वितरण प्रदान करेल. आतिथ्य बाजार काबिज करण्यासाठी या उद्योगातील जागतिक नेत्यांची ताकद एकत्रित करण्याच्या महत्त्वाकांक्षेसह हा नवीन प्लॅटफॉर्म 2030 पर्यंत एकॉर ब्रॅंड अंतर्गत 300 हॉटेल्सच्या नेटवर्कचे लक्ष्य ठेवलं आहे.
ऐतिहासिक भागीदारीत काय ठरलं?
एकॉर एक आघाडीचा जागतिक आतिथ्य समूह आहे. एकॉर कंपनीची देशात एकूण 71 हॉटेल्स असून आणखी 40 विकासाच्या टप्प्यात आहेत. इकॉनॉमीपासून लक्झरी ब्रॅंड्सपर्यंत एकॉरचा विस्तार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून एकॉर आपल्या फुटप्रिंटचा लक्षणीय विस्तार करेल. ते संचालन सुव्यवस्थित करेल. ज्यामुळे इकॉनॉमीपासून ते लाइफस्टाइल आणि लक्झरीपर्यंत सर्व क्षेत्रांत भारतीय बाजारात ठोस विकासाबाबतची त्यांची वचनबद्ध राहील.
इंटरग्लोब एक आघाडीचा भारतीय समूह आहे. हा समूह प्रवास आणि आतिथ्य या क्षेत्रात काम करतो. हवाई वाहतूक (इंडिगो), हॉटेल्स (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर), एअरलाइन व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स, प्रवास आणि AI सक्षम टेक्नॉलॉजीतही त्यांच ट्रॅक रेकॉर्ड देखील आहे. इंटरग्लोब हा इंडिगो एअरलाइनचा सर्वात मोठा स्टेकहोल्डर आहे. इंडिगोकडे 400 एकरक्राफ्ट आहेत. 130 शहरांना रोज 2200 नियमित उड्डाणांमार्फत जोडतात. 2025 या आर्थिक वर्षात या एअरलाइनने 118 मिलियन प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवले आहे.
भारताची आतिथ्याची क्षमता उघड करणे?
7 टक्के इतक्या GDP दराने वाढणारी अर्थव्यवस्था आणि 1.4 बिलियन लोकसंख्येसह भारत 2027 पर्यंत जगातील पाचवे सर्वात मोठे आउटबाउंड ट्रॅव्हेल मार्केट आहे. तिसरं सर्वात मोठं डोमेस्टिक ट्रॅव्हेल मार्केट बनण्याच्या मार्गावर आहे.
भारतातील हॉटेल उद्योग खूप विस्कळीत आहे. त्यामुळे ब्रॅंडेड कंपन्यांसाठी मोठी संधी आहे. इंटरग्लोबसोबत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी मजबूत करून भारताची संपूर्ण आतिथ्य क्षमता अनलॉक करण्याचे एकॉरचं ध्येय आहे. ज्यामुळे या क्षेत्रात मोठे परिवर्तन येईल. तसेच भारतीय प्रवाशांची देशातील गंतव्य स्थानांबरोबरच जगभरात सेवा करता येऊ शकेल.सर्व क्षेत्रांना सामावून घेणारे आतिथ्य केंद्र बनवण्याचा मानस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.