Aadhaar Update App: आता काही मिनिटांत होणार आधार अपडेट; UIDAI लाँच करणार QR कोड बेस्ड अ‍ॅप

UIDAI New App For Aadhaar Update: आता आधार अपडेट होणे अधिक सोपे होणार आहे. तुम्ही घरबसल्या अॅपवरुन आधार अपडेट करु शकणार आहात. यासाठी यूआयडीएआय नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Aadhaar Update
Aadhaar UpdateSaam Tv
Published On

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेकदा आधार कार्डमध्ये काही चुका असतात. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करावे लागतात. दरम्यान, आता आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरमध्ये जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन हे काम करु शकतात. यासाठी UIDAI नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

आता तुम्ही घसबसल्या आधार कार्ड अपडेट करु शकणार आहे. यामध्ये तुम्ही पत्ता, फोन नंबर,जन्म ऑनलाइन अपडेट करु शकतात.

Aadhaar Update
Aadhaar App: आधार कार्डची गरजच नाही! QR कोड स्कॅन करा अन् सर्व माहिती मिळवा; नवीन आधार अ‍ॅप लाँच

टाइम्स ऑफ इंडियानुसार, नवीन सिस्टीममधून तुम्हाला आता आधारची फोटोकॉपी द्यायची गरज नाही. यूआयडीएआयने नवीन अॅप तयार केला आहे. ज्यामध्ये QR कोडच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड किंवा मास्क्ड आधार शेअर करु शकणार आहे. यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आधार कार्ड शेअर करु शकणार आहात.

Aadhaar Update
Aadhaar Update: १० वर्षे जुनं आधार कार्ड आजच करा अपडेट! अन्यथा रेशन अन् पेन्शन विसरा

नोव्हेंबरमध्ये सुरु होणार अपडेट

नोव्हेंबर २०२५ पर्यंत आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, बायोमॅट्रिक अपडेट करण्याचे काम घरबसल्या मोबाईलवरुन होणार आहे. नवीन टेक्नोलॉजीमुळे तुम्ही जन्म प्रमाणपत्र, मॅट्रिक सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन याबाबतदेखील माहिती मिळवू शकतात. याचसोबत वीजेचं बिलदेखील या नवीन सिस्टीममध्ये जोडण्याच्या तयारीत आहे.यामुळे अनेक कामे सोपे होणार आहेत.

नवीन अॅप कसं असणार?

हे QR कोड बेस्‍ड अॅप खूप फायदेशीर असणार आहे. तुम्हाला अॅप टू अॅप आधार ट्रान्सफर करण्याची परवानगी देईल. यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये चेक इन, ट्रेनमध्ये ऑथेंटिकेशनसाठी या अॅपचा फायदा होणार आहे. यामुळे तुमची अनेक कामे सोपी होणार आहेत. अवघ्या काही मिनिटांत तुम्ही आधार कार्ड अपडेट करु शकणार आहात.

Aadhaar Update
Post Office RD Scheme: ३३३ रुपये गुंतवा अन् १७ लाख मिळवा; पोस्टाची जबरदस्त योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com