Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

Aadhaar-Pan Linking Step By Step Process: आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. तोपर्यंत जर तुम्ही आधार पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येतील.
Pan-Aadhaar Link
Pan-Aadhaar LinkSaam Tv
Published On
Summary

३१ डिसेंबरपूर्वी हे काम कराच

आधार-पॅन कार्ड लिंक केले नाही तर येतील अनेक अडचणी

बँकेत सॅलरी जमा होणार नाही, एसआयपीमध्येही येतील अडचणी

नोव्हेंबर महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामध्ये आधार कार्ड पासून ते पॅन कार्डच्या नियमांचा समावेश आहे. आता प्रत्येकाला आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, तुम्ही जर आधार पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुम्हाला बँकेसंबंधित अनेक कामे करताना अडचणी येणार आहेत.

Pan-Aadhaar Link
EDLI News: नोकरदारांच्या कामाची बातमी ! 'या' कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना EPFO देणार ₹७ लाख; नेमकी स्कीम आहे तरी काय?

तुम्हाला मुदतीपूर्वी आधार आणि पॅन कार्ड लिंक करावे लागतील. जर तुम्ही हे काम केले नाही तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. म्हणजेच तुमचे जर एसआयपी, टॅक्स, गुंतवणूकीसंबंधित कामे करु शकणार नाहीत. म्हणजेच बँक अकाउंटमधून एसआयपीचे पैसेदेखील जाणार नाही.

बँकेत येणार नाही पगार (Aadhaar-Pan Card Link Last Date)

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नदेखील दाखल करु शकणार नाही.तुम्हाला टॅक्स रिफंडदेखील मिळणार नाही. जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड बंद होईल, यामुळे तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना अडचणी येऊ शकतात.

Pan-Aadhaar Link
PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

पॅन आणि आधार कर्ड लिंक कसं करायचं? (How to Link Aadhaar-Pan Card)

सर्वात आधी www.incometax.gov.in या वेबसाइटवर जावे.

यानंतर Link Aadhaar वर क्लिक करा.

यानंतर तुमचा आधार नंबर आणि पॅन नंबर टाका.

यानंतर ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.

यानंतर तुम्हाला १००० रुपये शुल्क भरावे लागतील.

यानंतर तुम्ही Quick Links → Link Aadhaar Status वर जाऊन तुमचा स्टेट्‍स चेक करु शकतात.

Pan-Aadhaar Link
PAN-Aadhaar Linking: ...तर तुमचं पॅन कार्ड कायमचं होईल बंद, कधीपर्यंत दिली मुदत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com