PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Loan Fraud Prevention : पॅन कार्ड फसवणूक टाळण्यासाठी क्रेडिट रिपोर्ट तपासा, सायबर गुन्हे तक्रार करा आणि आर्थिक सुरक्षितता जपा. कर्ज फसवणूक रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
e-Pan Card
e-Pan Cardgoogle
Published On

पॅन कार्ड हे आपले आधार कार्डानंतरचे महत्वाचे ओळखपत्र आहे. मात्र ओळख चोरी आणि आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बनावट कर्ज घेण्यासाठी पॅन कार्डचा गैरवापर करण्याबाबतची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पॅन कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून थेट आपल्या बॅंकांशी जोडलेला महत्वाचा पुरावा असतो. त्याचा गैरवापराने गंभीर आर्थिक परिणाम घडू शकतो. पॅन कार्डाचा वापर करून घेतलेले फसवे कर्ज केवळ तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करत नाही, तर भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट मिळविण्याच्या संधींचेही नुकसान करु शकतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पॅन कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी आणि वेळेत ओळखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे आपला क्रेडिटचा रिपोर्ट तपासायला हवा. CIBIL, Experian, Equifax आणि CRIF High Mark यांसारख्या आघाडीच्या क्रेडिट ब्युरोमार्फत आपण आपल्या पॅन आणि मोबाईल नंबरच्या आधारे दरवर्षी एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकतो. यात आपल्या नावावर घेतलेल्या कर्जांची, क्रेडिट कार्डची, तसेच अलीकडील कर्ज चौकशीची माहिती मिळते. जर एखादे अनोळखी कर्ज, अपरिचित वित्तीय संस्था किंवा चुकीचे खाते तपशील दिसून आले, तर ते ओळख चोरीचे स्पष्ट लक्षण असू शकते.

e-Pan Card
Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

अशा वेळी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. संबंधित कर्ज देणाऱ्याशी संपर्क साधून फसवणुकीची माहिती द्यावी, क्रेडिट ब्युरोकडे वाद नोंदवावा आणि ओळखीचा पुरावा तसेच लेखी तक्रार सादर करावी. याशिवाय स्थानिक पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे औपचारिक तक्रार दाखल करणेही महत्त्वाचे आहे. भविष्यातील संदर्भासाठी सर्व कागदपत्रे आणि ईमेल संवाद सेव्ह करून ठेवणे आवश्यक आहे.

पॅन कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी अविश्वसनीय वेबसाइट्स, अॅप्स किंवा सोशल मीडियावर पॅन कार्डाची माहिती शेअर करणे टाळावे. पॅनचा फोटो फक्त आवश्यक ठिकाणीच द्यावा. मूळ पॅन कार्ड हरवल्यास तत्काळ डुप्लिकेट पॅनसाठी अर्ज करावा आणि ऑनलाइन बँकिंगसाठी मजबूत पासवर्ड वापरावा. तसेच कोणत्याही कर्ज किंवा क्रेडिट अर्जासाठी एसएमएस आणि ईमेल अलर्ट सक्रिय ठेवणेही सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरते. फसवणुकीच्या घटना वाढत असताना, आर्थिक जागरूकता आणि दक्षता राखणे आता अत्यावश्यक झाले आहे. तुमचा पॅन सुरक्षित ठेवणे हे एटीएम पिन किंवा आधार क्रमांक सुरक्षित ठेवण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

e-Pan Card
PF Withdrawal : नोकरी करतानाही पीएफचे पैसे काढता येतात! नियम आणि अटी जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com