

आधार कार्डधारकांसाठी खुशखबर बातमी आहे. आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट करायचा असेल किंवा जुना ईमेल बदलायचा असेल तर आता त्यासाठी शुल्क द्यावं लागणार नाही. UIDAI ने आधारधारकांना दिलासा देत ईमेल अपडेटची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध करून दिली आहे.
आधी आधारमध्ये ईमेल आयडी किंवा संबंधित तपशील अपडेट करण्यासाठी फी घेतली जायची. आता नवीन डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना हे काम घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज कमी होणार असून वेळ आणि मेहनतही वाचणार आहे.
UIDAI च्या नव्या Aadhaar Mobile App च्या माध्यमातून आधारशी संबंधित विविध सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधांचा यात समावेश आहे. युजर्सना अॅपवर लॉगिन करून आवश्यक पडताळणी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपला नवीन ईमेल आयडी अपडेट करता येईल.
आज बँकिंग, विमा, सरकारी योजना आणि ऑनलाइन व्हेरिफिकेशनसह अनेक सेवांमध्ये ईमेलचा वापर केला जातो. आधारशी योग्य ईमेल आयडी लिंक असेल तर महत्त्वाचे अपडेट आणि नोटिफिकेशन वेळेवर मिळायला मदत होते. जुना किंवा चुकीचा ईमेल आयडी असल्यास काही महत्त्वाची माहिती मिळण्यात अडचण येऊ शकते.
सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये UIDAI चे अधिकृत Aadhaar Mobile App डाउनलोड करा. त्यानंतर आधार क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करून उपलब्ध पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. पुढे Update Email किंवा संबंधित Aadhaar Details अपडेट करण्याचा पर्याय निवडा. नवीन ईमेल आयडी नोंदवून माहिती तपासा आणि रिक्वेस्ट सबमिट करा. रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर Service Request Number (SRN) मिळेल. या क्रमांकाच्या मदतीने अपडेट रिक्वेस्टची स्थिती ट्रॅक करता येईल.
त्यामुळे आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट न केलेल्या किंवा जुना ईमेल बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतची मोफत सुविधा महत्त्वाची ठरू शकते. अपडेट करण्याआधी UIDAIच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाईटवरच्या ताज्या सूचनांची खात्री करणं योग्य ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.