8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी १८,००० वरुन ५१,४८० होण्याची शक्यता

8th Pay Commission Salary Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार ३ पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिटमेंट फॅक्टरवर ही पगारवाढ अवलंबून असणार आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

कर्मचाऱ्यांचा पगार ३ पट वाढणार

बेसिक सॅलरी १८,००० वरुन ५१,४८०होण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढत आहेत. दरम्यान, यासाठी सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर, पगारवाढीबाबत निर्णय घेतला जाईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगारवाढ कधी येणार? वाचा सविस्तर

आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी सादर करण्यास सांगितल्या आहेत. यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग २०२७ पर्यंत लागू होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फिटमेंट फॅक्टर किती होणार? (8th Pay Commission Fitment Factor)

आठवा वेतन आयोग हा १ जानेवार २०२६ पासून लागू झाला आहे. प्रत्यक्ष पगारवाढ कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर जेवढा वाढणार तेवढी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या बेसिक सॅलरीला फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते त्यानंतर पगार वाढला जातो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा एरिअर एकत्र मिळणार? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. हा फिटमेंट फॅक्टर २.८६ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. लेव्हल १ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५१,४८० होऊ शकते. १९,९०० सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार ५६,९१४ होऊ शकतो. लेव्हल ३ कर्मचाऱ्यांचा पगार २१,७०० वरुन ६२,०६२ होऊ शकतो. तर लेव्हल ६ कर्मचाऱ्यांचा पगार ३५,४०० ते १ लाख रुपये होऊ शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com