8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती

8th pay commission Fitment Factor Explained: आठव्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार हे घ्या जाणून...
8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
8th pay commission updateSaam Tv
Published On

Summary -

  • ८वा वेतन आयोग लागू झाला पण अहवाल प्रतीक्षेत

  • फिटमेंट फॅक्टरनुसार पगारवाढ ठरणार

  • २.५७ ते ३.२५ पर्यंत फॅक्टरची शक्यता

  • कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. ही पगारवाढ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पगार आणि पेन्शनमधील वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. वेतन आयोगाने स्वीकारलेल्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगार आणि पेन्शनमधील वाढ होईल. पण अद्याप आठव्या वेतन आयोगाने निश्चित फॉर्म्युला जाहीर केला नाही.

केंद्र सरकारने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ८ व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचा निर्णय या अहवालाच्या आधारे घेतला जाणार आहे. कारण ८ वा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कर्मचाऱ्यांना थकबाकी देखील दिली जाईल.

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

५ व्या वेतन आयोगाच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांना २१ महिन्यांची ११२०० रुपयांची थकबाकी दिली होती. तर ७ व्या वेतन आयोगाच्या काळात कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची १३५०० रुपयांची थकबाकी मिळाली होती. आता आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना नेमकी किती थकबाकी मिळते हे पाहणे महत्वाचे राहिल.

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? १३ एप्रिलला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

८ वा वेतन आयोगामध्ये २.५७ फिटमेंट फॅक्टरनुसार मूळ वेतन किती असेल?

स्तर १ ते स्तर ४ - ४६२६० रुपये ते ६५५३५ रुपये

स्तर ५ ते स्तर ८ - ७५०४४ रुपये ते १२२२३२ रुपये

स्तर ९ ते स्तर १२ - १३६४६७ रुपये ते २०२५१६ रुपये

स्तर १३ ते स्तर १३अ - ३१६३६७ रुपये ते ३३६८२७ रुपये

स्तर १४ ते स्तर १६ - ३७०५९५ रुपये ते ५२७८७८ रुपये

स्तर १७ ते स्तर १८ – ५७८२५० रुपये ते ६४२५०० रुपये

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

८ वा वेतन आयोगामध्ये जर फिटमेंट फॅक्टर ३.० राहिला तर...

स्तर १ ते स्तर ४ - ५४,००० रुपये ते ७,६५,००० रुपये

स्तर ५ ते स्तर ८ - ८७६०० रुपये ते १४२८०० रुपये

स्तर ९ ते स्तर १२ - १५९३०० रुपये ते २३६४०० रुपये

स्तर १३ ते स्तर १३अ - ३६९३०० रुपये ते ३९३३०० रुपये

स्तर १४ ते स्तर १६ - ४३२६०० रुपये ते ६१६२०० रुपये

स्तर १७ ते स्तर १८ - ६७५,००० रुपये ते ७५०,००० रुपये

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार?

८ वा वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर ३.२५ रुपयांच्या बाबतीत कसा असेल?

स्तर १ ते स्तर ५ - ५८५०० रुपये ते ९४९०० रुपये

स्तर ६ ते स्तर १० - ११५०५० रुपये ते १८२३२५ रुपये

स्तर ११ ते स्तर १२ - २२००२५ रुपये ते २५६१०० रुपये

स्तर १३ ते स्तर १३ अ - ४०००७५ रुपये ते ४२६०७५ रुपये

स्तर १४ ते स्तर १८ - ४६८६५० रुपये ते ८१२५०० रुपये

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार? जाणून घ्या A टू Z माहिती
8th Pay Commission: १३ एप्रिलला फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com