

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पगार किती मिळणार, एरियर किती मिळणार याबाबत प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान, द इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना जर २० महिन्यांचा एरियर दिला तर कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळू शकतात.
ज्या कर्मचाऱ्यांचा पगार ५०,००० रुपये बेसिक सॅलरी आहे त्यांना ३.६ लाख ते १५ लाखांपर्यंतचा एरियर मिळू शकतात. दरम्यानस या आकडेवारीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरकारने याबाबत माहिती दिलेली नाही.
वेगवेगळ्या पे लेव्हलसाठी एरियर
जर लेव्हल १ ते लेव्हल ८ कर्मचाऱ्यांच्या एरियरमध्ये फरक असणार आहे. लेव्हल १ म्हणजे ज्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे त्यांना ३.६ लाख ते ५,६५ लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल ३ कर्मचाऱ्यांना ४.३४ लाख ते ६.८१ लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल ५ कर्मचाऱ्यांना ५.८४ ते ९.१६ लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल ८ कर्मचाऱ्यांना ९.५२ लाख ते १४.९४ लाख रुपयांचा एरियर मिळण्याची शक्यता आहे.
जर २० महिन्यांचा एरियर मिळाला तर तो इतका असू शकतो. याचसोबत जर प्रत्येक लेव्हलसाठी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर निश्चित केला तर पगारवाढ वेगवेगळी येऊ शकते. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आठव्या वेतन आयोगात २.० ते २.५७ फिटमेंट होण्याच्या चर्चा सुरु आहे. कर्मचारी संघटना ३.०ते ३.२५ फिटमेंट फॅक्टर करण्याची मागणी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.