

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याचदरम्यान, कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत १८,००० रुपयांवरून थेट ६९,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. कर्मचारी संघटानांकडून ३.८३३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात असल्याने १४० टक्के पगारवाढीचा आकडा समोल आला आहे. पण ही वाढ प्रत्यक्षात लागू होणार का? हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.
सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. आता आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनांकडून ३.८३३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरचा वापर जुन्या सॅलरीच्या आधारे नवीन मूळ सॅलरीचे कॅलक्युलेशन केलं जातं.
सध्याची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. त्याला ३.८३३ ने गुणल्यावर ६८,९९४ रुपये होतात. म्हणजेच या मागणीनुसार बेसिक सॅलरी जवळपास ६९,००० रुपये होऊ शकते. पण हा कर्मचारी संघटनांच्या मागणीवर आधारित आकडा असून सरकारने त्याला अधिकृत मंजुरी दिलेली नाही.
समजा, सध्याची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे आणि महागाई भत्ता ६० टक्के आहे. या उदाहरणात महागाई भत्ता १०,८०० रुपये होतो. त्यामुळे बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता मिळून एकूण रक्कम २८,८०० रुपये होते.
आता प्रस्तावित ६९,००० रुपयांच्या मूळ सॅलरीची या रकमेबरोबर तुलना केल्याने फरक ४०,२०० रुपये होतो. या फरकाची टक्केवारी काढल्याने वाढ जवळपास १३९.६ टक्के दिसते. याच कॅलक्युलेशनमधून १४० टक्के वाढीचा आकडा चर्चेत आला आहे.
कोणालाच या माहिती बद्दल निश्चितपण सांगता येणार नाही. कारण ३.८३३ फिटमेंट फॅक्टर आणि ६९,००० रुपयांची बेसिक सॅलरी अजून अधिकृतपणे मंजूर झालेली नाही. तसेच सातव्या वेतन आयोगातल्या १४.३ टक्के प्रत्यक्ष वेतनवाढ आणि सध्याच्या कॅलक्युलेशनमध्ये १४० टक्के हे वेगवेगळ्या आधारांवर काढलेले आकडे आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हातात येणारा पगार १४० टक्क्यांनी वाढेल, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशी आणि सरकारच्या निर्णयानंतरच प्रत्यक्ष वेतनवाढ स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.