Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

Aadhaar Update Rules: आधार कार्डावरचा पत्ता किंवा नाव बदलायचा असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे महत्त्वाचं आहे.
Aadhaar Card Update
Aadhaar Card Updatesaam tv
Published On: 

Aadhaar Card Update: आधार कार्ड हे बँकेतल्या कामासाठी, सरकारी योजनांचा लाभ आणि इतर सेवांसाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून मागितले जाते. त्यामुळे आधार कार्डावर नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची असेल तर ती दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. पण प्रत्येक बदलासाठी वेगवेगळी कागदपत्रं सादर करावी लागतात. त्यामुळे आधार अपडेट करण्याआधी कोणत्या दुरुस्तीसाठी कोणते पुरावे लागतात हे, जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्डवरचं नाव त्यातली स्पेलिंग चुकीची असेल तर किंवा नावात बदल करायचा असेल तर ओळखीचा पुरावा (Proof of Identity) गरजेचा असतो. यासाठी भारतीय पासपोर्ट, मतदार आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेले फोटो आयडी, मान्यताप्राप्त बोर्डाचा रिझल्ट किंवा प्रमाणपत्र आणि लग्नाचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे तुम्ही वापरू शकता. मात्र संबंधित बदलासाठी UIDAI ने मान्य केलेला पुरावा सादर करणं गरजेचं आहे.

Aadhaar Card Update
Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

घर बदलल्यानंतर आधार कार्डावरचा पत्ता अपडेट करायचा असेल तर पत्त्याचा पुरावा (Proof of Address) द्यावा लागतो. यासाठी भारतीय पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, लाईट बिल , पाणी बिल, गॅसची पावती, पोस्टपेड मोबाइल बिल तसेच नोंदणीकृत भाडेकरार यांसारखे पुरावे वापरता येतात.

Aadhaar Card Update
Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी कोणते पुरावे लागतात?

आधार कार्डावरची जन्मतारीख चुकली असेल तर जन्माचा दाखला, भारतीय पासपोर्ट किंवा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचा रिझल्ट किंवा प्रमाणपत्र यांसारख्या जन्मतारखेचा पुरावा गरजेचा असू शकतो. कोणते पुरावे स्वीकारले जातील, हे UIDAI च्या अपेडट केलेल्या नियमांनुसार तपासावे.

ऑनलाइन अपडेट की आधार केंद्रात जावे?

पत्त्याचा बदल ऑनलाइन करता येऊ शकतो. त्यासाठी आधारशी मोबाइल क्रमांक लिंक असणं आणि संबंधित कागदपत्रं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नाव आणि जन्मतारखेतल्या बदलांसाठी आधार सेवा केंद्रात जाऊन प्रोसेस करावी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com