Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीची तयारी

दिवाळी जवळ आली की घराची सजावट, पूजा आणि तोरणांसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, घरातील कुंडीत झेंडूचे रोप असूनही त्याला कमी फुले येत असतील, तर काही सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.

marigold flowering tips

रोपाची उंची

झेंडूचं रोप जवळपास ६ ते ८ इंच उंच झाल्यावर त्याच्या वरचे कोवळे टोक हलके कापून टाका, यामुळे बाजूच्या फांद्या फुटायला मदत होते.

marigold flowering tips

योग्य वेळ

रोपाला चार ते सहा पानांचा संच आल्यावर स्वच्छ कात्रीने वरचा एक ते दोन इंच भाग कापा. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी ही कृती करा.

marigold flowering tips

नव्या फांद्या

वरचा वाढणारा भाग काढल्यामुळे रोपाची वाढ बाजूच्या फांद्यांकडे वळू शकते, ज्यामुळे रोप अधिक दाट होऊन फुलांच्या कळ्यांची संख्या वाढण्यास मदत होते.

how to grow marigolds

कळ्यांची काळजी

रोप लहान आणि कमकुवत असताना कळी दिसल्यास ती काढण्याचा विचार करू शकता.

how to grow marigolds

भरपूर सूर्यप्रकाश

झेंडूच्या रोपाला दररोज पाच ते सहा तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा, कारण पुरेसा प्रकाश फुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे.

marigold plant pruning

योग्य पाणी

कुंडीतील मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी द्या आणि जास्त पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला छिद्रे असल्याची खात्री करा.

marigold plant pruning

सेंद्रिय खत

रोपाच्या गरजेनुसार कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत वापरा. जास्त खत दिल्याने मुळांना नुकसान होऊ शकते, त्यामुळे योग्य प्रमाण राखा.

marigold pruning technique

खताचा वापर

मोहरीच्या पेंडीचे पूर्णपणे कुजवलेले आणि पाण्यात योग्य प्रमाणात विरघळवलेलं द्रावण वापरता येते. मात्र गडद किंवा जास्त प्रमाणातील द्रावण टाळा.

marigold pruning technique

NEXT : शत्रूच नाही तर संकटंही तुमच्यासमोर होतील नतमस्तक; जीवनाचं हे सत्य बदलतील तुमचं आयुष्य

Chanakya Niti in Marathi
येथे क्लिक करा