8th Pay Commission : सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹69 हजार मिनिमम सॅलरी, ₹45 हजार पेन्शनची मागणी

Da Hike : आठव्या वेतन आयोगासमोर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. ६९ हजार बेसिक सॅलरी, ४५ हजार पेन्शन आणि फिटमेंट वाढीसह DA-DR वाढीची मागणी करण्यात आली आहे.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगासमोर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन- पेन्शनशी संबंधित बऱ्याच मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. भारत पेन्शनर्स समाजाने (BPS) नुक्त्यात झालेल्या दिल्लीतल्या बैठकीत आयोगाच्या सदस्यांसमोर आपल्या मागण्यांचे सादरीकरण केले.

भारत पेन्शनर्स समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने चंद्रलोक भवन, जनपथ इथल्या आयोगासमोर अनेक मुद्दे मांडले. BPS देशभरातले १० लाख पेन्शनधारकांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

8th Pay Commission
Gold-Silver Price : आजही सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळा सोनं कितीला मिळणार? पाहा २४, २२ कॅरेटचे ताजे दर

बेसिक सॅलरी आणि पेन्शन किती असावी?

BPS ने ५.२ वेटेड फॅमिली युनिटच्या आधारे बेसिक पेन्शन ठरवण्याची मागणी केली आहे. यामध्ये कर्मचारी, जोडीदार, मुलं आणि आश्रित पालकांचा विचार करण्याची सूचना आहे तसेच बेसिक सॅलरी ६९ हजार रुपये आणि त्यासाठी ३.८३ फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. बेसिक पेन्शन ४५ हजार रुपये असावी, अशीही मागणी आहे.

8th Pay Commission
PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

रिटायरमेंटच्या वेळी मिळणाऱ्या शेवटच्या सॅलरीच्या ६७ टक्के पेन्शन आणि कुटुंब रिटायरमेंटच्या बाबतीत ५० टक्के रक्कम ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दर तीन महिन्यांनी DA-DR वाढ?

महागाई भत्ता आणि महागाई राहत दर तीन महिन्यांनी बदलण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी BPS ने केली आहे. तसेच DR २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर मूळ पेन्शनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करावा, असंही सुचवण्यात आलं आहे. याशिवाय पेन्शनमध्ये समानता, दर पाच वर्षांनी सॅलरी-पेन्शनमध्ये बदल, HRA आणि LTC सुविधा, CCHS मध्ये सुधारणा आणि कॅशलेस उपचारांची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. फिक्स्ड मेडिकल अलाउन्स ५ हजार रुपये करण्याची मागणीही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com