

मोबाईल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल युजर्सला २८-दिवसांच्या प्लॅनऐवजी ३०-दिवसांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. सरकारनं नवीन रिचार्जचा नियम लागू केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी याबाबत माहिती दिलीय. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने लागू केलेल्या नवीन नियमाचा फायदा देशभरातील युजर्सला होईल, असं चढ्ढा म्हणालेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्राम'वर एक 'रील' शेअर करताना त्यांनी ही माहिती दिलीय.
या नवीन नियमांचा फायदा फक्त त्या युझर्सला होईल जे इनकमिंग कॉलच्या सुविधांसाठी फोन वापरतात. त्या ग्राहकांसाठी 'इनकमिंग कॉल' आणि 'मेसेजिंग'चे पॅकेजेस उपलब्ध करून दिले जातील. राघव चढ्ढा म्हणाले की, त्यांनी फेब्रुवारीमध्येच संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सूचनेनुसार सरकारने आता हा नियम लागू केलाय. पुढे बोलताना चढ्ढा म्हणाले की, संसदेत लोकांच्या समस्या कशा मांडल्या जातात. त्यावर सरकार दखल घेऊन कसा निर्णय घेते, याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलंय.
ते म्हणाले, "११ मार्च २०२६ रोजी मी संसदेत प्रीपेड मोबाईल युजर्सला भेडसावणाऱ्या काही समस्या मांडल्या होत्या. काही लोक डेटाचा वापर करत नाहीत आणि केवळ 'इनकमिंग कॉल्स'च्या सुविधेसाठीच आपल्या फोनचा वापर करतात. याकडेही मी लक्ष वेधले होते. मला हे सांगताना आनंद होतोय, सरकारने त्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. 'ट्राय'ने (TRAI) 'टेलिकॉम ग्राहक संरक्षण (१३ वी सुधारणा) नियम, २०२६' लागू केले आहेत. याअंतर्गत झालेला पहिला मोठा बदल म्हणजे, आता रिचार्जची वैधता २८ दिवसांऐवजी ३० दिवसांची असणार आहे.
राघव चढ्ढा यांनी सांगितले की, आता तुम्ही केवळ वापरत असलेल्या सेवांसाठीच पैसे द्याल. या मुद्द्यावर अधिक स्पष्टीकरण देताना चढ्ढा म्हणाले, "ज्या ग्राहकांना डेटाचा समावेश असलेले रिचार्ज प्लॅन्स नको आहेत, त्यांना आता केवळ 'इनकमिंग कॉल्स' आणि 'टेक्स्ट मेसेजेस'ची सुविधा देणारे प्लॅन्स घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तुम्हाला केवळ आवश्यक असलेल्या विशिष्ट सेवांसाठीच शुल्क आकारले जाईल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.