Union Budget 2025: 1 लाख, 2 लाख, 3 लाख पगार...; किती कमाईवर किती टॅक्स वाचणार? सोपं गणित, सोप्या भाषेत समजून घ्या!

How You Income Upto 12 lakh Rupees Tax Free: निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. १२ लाखांचे उत्पन्न असल्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.
Union Budget 2025
Union Budget 2025Saam Tv
Published On

मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममधील पहिले अर्थसंकल्प सादर केले आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. याचसोबत टॅक्स डिडक्शन ७५००० रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार आहे.

Union Budget 2025
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार, आज सादर करणार आठवा अर्थसंकल्प

१२ लाखावंर किती टॅक्स लागणार?

निर्मला सितारामन यांनी नवीन टॅक्स स्लॅबची घोषणा केली आहे. यात १२.७५ लाख रुपयांचे उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे.यात स्टँडर्ड डिडक्शनचादेखील समावेश आहे. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये जर तुमची कमाई १३ लाख ते १६ लाख असेल तर तुम्हाला १५ टक्के टॅक्स भरावा लागत नाही.

सरकारच्या नवीन टॅक्स स्लॅबमध्ये १६ ते २० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के लागणार आहे. २० ते २४ लाख रुपयांवर २५ टक्के टॅक्स लागणार आहे. त्यापेक्षा जास्त कमाईवर ३० टक्के टॅक्स लागणार आहे.

कॅलक्युलेशन

जर तुमचे उत्पन्न १२ लाख असेल तर ८०,००० रुपयांची बचत होणार आहे.जुन्या कर प्रणालीनुसार, जर कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न १२ लाख रुपये असेल तर त्यावर ८०००० रुपये टॅक्स भरावा लागत होते.. परंतु आता तुम्हाला कर भरावा लागणार नाही.नवीन टॅक्स स्लॅबमध्ये १६ लाखांच्या कमाईवर ५०,००० रुपयांची बच होणार आहे.. १८ लाखांच्या उत्पन्नावर ७० हजारांची बचत होणार आहे. २० ते २४ लाखांच्या उत्पन्नावर १.१० लाख रुपयांची बचत होणार आहे.

Union Budget 2025
Union Budget 2025: नवीन इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा
Union Budget
Union Budget Saam Tv

नवीन टॅक्स स्लॅब

० ते ४ लाखांपर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही. ४-८ लाखांपर्यंत ५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. ८-१० लाखांपर्यंत १० टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. १२ ते १६ लाखांपर्यंत १५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे.

Union Budget 2025
Union Budget 2025: नवीन इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com