Breaking News Live Updates: WHOच्या अलर्टनंतर केंद्राची राज्यांना गाईडलाईन

Maharashtra Breaking Updates Live in Marathi: आज १८ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...
Maharashtra Vidhan Sabha Hiwali adhiveshan Mumbai Pune Nashik Nagpur latest batmya maratha reservation marathi news Assembly Winter Session 2023 Live
Maharashtra Vidhan Sabha Hiwali adhiveshan Mumbai Pune Nashik Nagpur latest batmya maratha reservation marathi news Assembly Winter Session 2023 LiveMaharashtra Hiwali Adhiveshan 2023 Live Newsin Marathi- Saam TV
Published On

Corona Virus: WHOच्या अलर्टनंतर केंद्राची राज्यांना गाईडलाईन

देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहेत. देशभरात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झालाय. वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर WHO ने अलर्ट जारी केलाय. तर केंद्र सरकारने राज्यांना गाईडलाईन जाहीर केलीय.

मुंबईतील जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग, परिसरात धुराचे लोट

मुंबईतील जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे. या हॉटेलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे.

प्रिया सिंग मारहाण प्रकरणात अश्वजीत गायकवाडसह दोघांना जामीन

प्रिया सिंग मारहाण प्रकरणात अश्वजीत गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे पोलीस तपास कामात सहकार्य करणे; तसेच फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर कोणताही दबाव टाकू नये अशी अट

Parliament Security Breach : संसद सुरक्षाभंग प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक, खासदारांवर निलंबनाची कारवाई

संसदेतून या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकूण ४७ खासदारांचे निलंबन

यापूर्वी लोकसभेतून १३ आणि राज्यसभेतून १ अशा १४ खासदारांचे निलंबन झाले होते.

आज लोकसभेतून ३३ खासदारांचे निलंबन

त्यामुळं आतापर्यंत संसदेतील निलंबित खासदारांची संख्या ४७ वर

अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे या मागणीवर विरोधी पक्ष ठाम

भेसळीचा संशय, पनीर तयार करणाऱ्या कंपनीवर FDA ची धाड; तेल आणि दूधाचा साठाही जप्त

नाशिक

अन्न आणि औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

१ लाख रुपये किंमतीचं भेसळयुक्त पनीर आणि तेल आणि दुधाचा साठा जप्त

तिस्ता क्रोप केअर कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

कंपनीत रिफाईन्ड पोमोलिन ऑईल, अज्ञात पांढरा पदार्थ आणि मिक्स दुधाचा वापर करून तयार केलं जात होत भेसळयुक्त पनीर

अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलेला साठा अन्न विश्लेषण विभागाकडे पाठवला

अहवाल आल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील कारवाई करणार

पुण्यात कचरा जाळणे भोवले, ५ दिवसांत ९ लाखांची दंडवसुली

पुणे शहरात कचरा जाळणे भोवले, पुणेकरांकडून ५ दिवसांत ९ लाख रुपये दंड वसूल

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाची कारवाई

गेल्या ५ दिवसांत २ हजार नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी ९ लाख रुपये दंड वसूल

गेल्या १५ दिवसांत महापालिकेने वसूल केला १९ लाख रुपये दंड

४० पेक्षा अधिक सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्या नागरिकांवरही कारवाईचा बडगा

नागपूर कंपनी स्फोटाच्या चौकशीची मागणी, उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली शंका

नागपूरमधील कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेवर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

स्फोटात काही लोकांचा जीव गेला.

घातपात होता की अजून काही. चौकशी व्हायला हवी.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज ठाकरेंवरही टाका केली आहे.

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत बैठक, त्याआधीच संभाजीराजेंची महत्वाची प्रतिक्रिया

नवी दिल्ली

मराठा आरक्षणासंदर्भात आज, सोमवारी दिल्लीत बोलावली महत्वाची बैठक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा मुद्दा ऐरणीवर आहे - संभाजीराजे छत्रपती

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र देखील महत्वाचं असल्याचे वक्तव्य

आरक्षण देण्याची जबाबदारी सर्व खासदारांची आहे. आरक्षणासाठी आवाज उठवावा यासाठी सर्व खासदारांना निमंत्रण दिले आहे.

मी महत्वाच्या खासदारांना कॉल केला आहे, माझ्या ऑफिसनेही पत्रे दिली आहेत.

मला अपेक्षा आहे की न्याय देण्यासाठी सर्व खासदार उपस्थित राहतील, संभाजीराजेंची माहिती

Breaking News Live Updates: भयंकर! दारूवरून बोलल्याचा रागातून भाच्याने केला मामाचा खून

भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात समोर आहे. बाबुलाल सोमा गावित हे गेल्या दोन महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिन्द्र माणभावकडे राहत होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास 'तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले आहे, त्याला दवाखान्यात दाखवायला तुझ्याकडे पैसे नाही पण दारू प्यायला पैसे आहेत' असे मामा बोलल्याचा मच्छिन्द्रला राग आल्याने त्याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले.

तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने मामाचा काही वेळातच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हा मृतदेह शुक्रवारी दिवसभर घरातच ठेवण्यात आला होता.

पोलीसांकडे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नव्हते अखेर शनिवारी पोलिसांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रविवारी शव विच्छेदन अहवाल प्राप्त होताच मच्छिन्द्र माणभावविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

Breaking News Live Updates: अर्नाळा पोलीस स्टेशन परिसरातील मैदानाला आग; 12 वाहने जळून खाक

विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मैदानात सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत पोलिसांनी जप्त केलेली १२ वाहने जळून खाक झाली. घटनास्थळी अर्नाळा पोलीस व अग्निशम दलाचे दोन बंब दाखल झाले.

तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमध्ये वाहने जळून खाक झाली असून आजूबाजूची झाडं होरपळली आहेत.

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडला

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाजवळ गोरख संत या तरुण शेतकऱ्याने गेल्या आठवड्यापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकाने घेतला आहे. या उपोषणकर्त्या तरुणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील शेतकरी सुद्धा सरसावले आहेत.

सोमवारी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीचा कांदा लिलाव बंद पडला आहे. बाजार समिती बाहेरील गेटजवळ येत शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. येत्या काही दिवसांत कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Breaking News Live Updates: अमरावतीच्या अचलपुरात NIAची छापेमारी; शिक्षकाचा मुलगा ताब्यात

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास NIA पथकाने छापेमारी केली. यावेळी एका शिक्षकाच्या मुलाची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. NIA ने ताब्यात घेतलेला युवक जिहादी या दहशतवादी संघटनेत सक्रिय असल्याची माहिती आहे.

Breaking News Live Updates: नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; १०७ पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. तब्बल १०७ पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सानपाडा येथे आज सायंकाळी हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Breaking News Live Updates: मनसेचे आता 'मिशन लोकसभा', राज ठाकरे घेणार २२ जागांचा आढावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. वांद्रे येथील MIG क्लबमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

बैठकीसाठी राज ठाकरे हजर झाले आसून लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेतला जाणार आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

Breaking News Live Updates: अमरावतीच्या अचलपूरमध्ये NIA कडून छापेमारी; संशयित विद्यार्थ्याची चौकशी सुरू

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास NIA पथकाने अचानक छापेमारी केली. यावेळी एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. हा विद्यार्थी अचलपुरातील एका स्थानिक महाविद्यालयातील आहे.

सदर विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतला असावा, असा संशय आल्याने NIA पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. NIA पथकाच्या अचानक छापेमारीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Breaking News Live Updates: लातूरमध्ये खासगी बसची दुचाकीला धडक; महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू

लातूर शहरातील सम्राट चौक इथे सोमवारी सकाळी 8 वाजता एका खाजगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे. तर एक युवक गंभीर रित्या जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

Breaking News Live Updates: उजनी धरणाच्या पाणीपातळीत कमालीची घट; इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती

उजनी धरणाची पाणीपातळी कमालीची घटल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. डिसेंबरच्या मध्यावर उजनीत केवळ बारा टीएमसी जिवंत पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सोलापूर, नगरसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला जीवनदायी ठरलेले उजनी धरण १२३ टीएमसी क्षमतेचं आहे. सध्या उजनी धरणात ७५.६८ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा हा मृत साठा म्हणून गणला जातो. इतिहासात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्याने पाणीप्रश्न उद्भवणार. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी घरणात १२३ टीएमसी पाणीसाठा होता, तर टक्केवारी १११.२८ एवढी होती

Breaking News Live Updates: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात मोठी घोषणा करणार?

नागपुरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू असून आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. २४ डिसेंबरच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

२४ डिसेंबरनंतर सरकारला वेळ देणार नसल्याचा निर्णय त्यांनी रविवारी जाहीर केला आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती दिल्लीत जाणार आहे. आजपासून पुढील तीन दिवस अर्थात 20 डिसेंबरपर्यंत सुनावणीतील अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे.

महाराष्ट्रासाठी सोमवार अपघाताचा वार ठरत आहे. आतापर्यंत ४ ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघात १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देश विदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी तुम्हाला साम टीव्हीवर वाचता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com