B12 Deficiency google
लाईफस्टाईल

Vitamin B12 Symptoms: B12 कमी होण्यामागची कारणे कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती, वाचा लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

B12 Deficiency: बदलत्या जीवनशैलीमुळे व्हिटॅमिन B12 ची कमतरता वाढत आहे. थकवा, स्मरणशक्ती कमी होणे, हातपाय सुन्न होणे अशी लक्षणे दिसू शकतात. कारणे, धोके आणि नैसर्गिक उपाय जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  • बदलत्या आहार आणि पचनाच्या समस्यांमुळे व्हिटॅमिन B12 ची कमतरता वाढते.

  • थकवा, हातपाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे ही प्रमुख लक्षणे दिसतात.

  • अंडी, दूध, फोर्टिफाइड फूड्स आणि सप्लिमेंट्सच्या मदतीने B12 पातळी नैसर्गिकरीत्या वाढवता येते.

बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराच्या, झोपेच्या आणि दैनंदिन सवयींवर खूप परिणाम होतो. त्यामध्ये बऱ्याचदा व्हिटॅमिन्सकडे सगळेच दुर्लक्ष करत असतात. बऱ्याचदा व्हिटॅमिनची कमी झाल्यावर शरीर आपल्याला संकेत देतं, लक्षणे जाणवतात. याची सुरुवात अगदी सामान्य लक्षणांपासून होते. जसे की, थकवा, न्यूरोलॉजिकल समस्या, हृदयविकाराचा वाढलेला धोका यांसारखे परिणाम शरीरावर दिसू लागतात.

व्हिटॅमिन्स शरीराच्या योग्य कार्यासाठी खूप महत्वाचे असते. त्यामध्ये व्हिटॅमिन B12 ला विशेष महत्व असते. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंकज चौधरी यांच्या मते, व्हिटॅमिन B12 ची कमी पातळी पुढे न्यूरोलॉजिकल नुकसानापर्यंत जाऊ शकते. शाकाहारी व्यक्ती, वृद्ध लोक आणि पचनाशी संबंधित विकार असलेले रुग्ण यांच्यात B12 ची कमतरता आढळण्याचा धोका जास्त असतो. कारण या व्हिटॅमिनचा मुख्य स्रोत प्रामुख्याने नॉन व्हेजमध्ये असतो. शाकाहारी किंवा व्हेगन आहार घेणाऱ्या व्यक्तींना नैसर्गिकरीत्या B12 मिळत नसल्याने त्यांना फोर्टिफाइड फूड्स किंवा सप्लिमेंट्सवर अवलंबून राहावे लागतं.

पचनातील अडचणी देखील या कमतरतेचे मोठे कारण ठरतात. पर्निशस अ‍ॅनिमिया, क्रोन्स डिसीज, सिलीअ‍ॅक डिजीज यांसारख्या समस्यांमुळे शरीरात B12 शोषणाची क्षमता कमी होते. पोटातील आम्लाचे प्रमाण वयानुसार कमी होत असल्याने वृद्धांना हा धोका अधिक जाणवतो. मधुमेहासाठी दिले जाणारे मेटफॉर्मिन किंवा अ‍ॅसिडिटीवरील प्रोटोन पंप इनहिबिटर्स या औषधांचा दीर्घकालीन वापर B12 शोषण आणखी कमी करू शकतो.

हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे, अतिशय तीव्र परिस्थितीत डिमेंशियासारख्या समस्या उद्भवू शकतात. लाल रक्त पेशींची निर्मिती कमी झाल्यामुळे मेगालोब्लास्टिक अ‍ॅनिमिया तयार होतो. यामुळे अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि त्वचा पांढरी पडणे अशी लक्षणे दिसतात. मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम जाणवतो. चिडचिडेपणा, नैराश्य, मूड डिसऑर्डर आणि क्वचित प्रसंगी मानसोपचाराशी संबंधित तीव्र लक्षणे देखील आढळतात. हृदयविकाराचा धोका वाढण्यामागेही B12 ची कमतरता कारणीभूत ठरते कारण हे व्हिटॅमिन होमोसिस्टीनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील अंधेरी पश्चिम - गुंदवली मेट्रो सेवा विस्कळीत

Devendra Fadnavis : भास्कररावांनी वडेट्टीवारांच्या माईकची बॅटरी बंद केली; CM फडणवीसांची विरोधकांवर जोरदार टीका

पुणे-कोल्हापूर महामार्ग कधी पूर्ण करणार? सुप्रिया सुळेंचा सवाल, नितीन गडकरींनी तारीखच सांगितली|VIDEO

Chinese Bhel Recipe : भेळेला द्या चायनीजचा तडका, वीकेंडची संध्याकाळ होईल चटपटीत

Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टॉप ५ स्पर्धकांची कमाई जाणून घ्या

SCROLL FOR NEXT