Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५, राज्यात थंडी गायब, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्यातील ४३८१ नावे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोटाळ्याचा संशय

अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४३८१ नावे समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे तसेच या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे. ही सर्व नावे श्रीगोंदाच्या मांडवगण जिल्हा परिषद गटातील असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र महापालिका प्रशासन सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर भविष्यात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले आहे.

वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पानिपत होणार - अविनाश जाधव

: वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 24व्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याच कार्यक्रमात जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत, पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘पानिपत’ होणार, असा दावा केला आहे.

वसई विरार शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. यामुळे पालिकेच्या निवडणुकीत नवनिर्माण सेनेची ताकद सर्व राजकीय पक्षांना कळेल. भारतीय जनता पक्ष हा अतिशय हुशार पक्ष आहे. जिथे त्यांची स्वतःची ताकद आहे. तिथे ते युती करत नाही. ठाणे, मुंबई, नवी मुंबई त्यांची युती नाही. मात्र वसई विरार मध्ये युती करतात म्हणजे त्यांची ताकद नाही.

बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बोगस मतदान झाल्याचा आरोप..

नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदान प्रक्रियेत बुलढाण्यात हजारो मतदान हे बोगस झाल्याचा आरोप अड सतीश चंद्र रोठे यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे .. या बोगस मतदानाची एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी लेखी पत्रा द्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.... तसेच मतदानाचा निकाल 21 डिसेंबर ला लागणार असल्याने ई व्ही एम मशीन नगर पालिका कार्यालयाच्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्या असून तिथे घोळ होऊ शकतो म्हणून अड सतीश चंद्र रोठे यांनी रात्रीचा मुक्काम देत पहारा देणे सुरु केले आहे.. दोन दिवसापासून हा कडक पहारा देणे सुरु असून तो 20 डिसेंबर पर्यंत सतत राहणार असल्याचे रोठे यांनी सांगितले आहे

यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत नेत्यांची कसोटी

यवतमाळ नगर पालिकेची निवडणूक येत्या वीस डिसेंबर रोजी होऊ घातली आहे.नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात नऊ उमेदवार असून नामांकन मागे घेण्यासाठी चार दिवसाचा कालावधीत उरलाय.या निवडणुकीत मंत्री संजय राठोड,मंत्री इंद्रनील नाईक,खासदार संजय देशमुख,मंत्री अशोक उईक,माजीमंत्री शिवाजीराव मोघे आणि भाजपाचे नेते मदन येरावार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द

इंडिगो विमान सेवेचा आमदारांना पण फटका बसला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली.

अनेक आमदारांनी आज दुपारच्या विमानाचे तिकीट काढले होते पण विमानं रद्द झाल्याने अनेक आमदारांनी स्वःच्या मोटारीने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूर मध्ये सुरवात होणार आहे. राज्याचे मंत्रिमंडळ आज नागपूरमध्ये होणार दाखल

यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

डिसेंबरच्या थंडीचा जोर जाणवू लागला आहे.तापमानात जवळपास दोन अंशाने घट झाली आहे.परिणामी यवतमाळ जिल्ह्यात दिवसाही हुडहुडी भरवणारे थंडगार वारे वाहत आहे.यामुळे घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे तर नागरिकांसह महिला शेकोट्या जवळ बसून उब घेतांना दिसताहेत.जिल्ह्यात पारा 10 अंशावर स्थिरावलाय.

पंढरपुरात माझा पराभव झाला तर पुन्हा तोंड दाखवणार नाही; भगीरथ भालकेंचे परिचारिकांना आव्हान

माझा पंढरपुरात पराभव झाला तर पुन्हा मंगळवेढ्यात तोंड दाखवणार नाही,तुमचा पराभव झाला तर तुम्ही तोंड दाखवायचं नाही असं खुल आव्हान पंढरपुरातील भगीरथ भालके यांनी दिले आहे.

मंगळवेढा नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलताना भालके यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा येथे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सभेत परिचारकांच्या दाव्याला थेट आव्हान दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३ दिवसांनंतर इंडिगोच्या मुंबई विमानांचे उड्डाण

तीन दिवस रद्द राहिलेल्या इंडिगोच्या सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमानांचे शनिवारी उड्डाण झाले. त्यामुळे मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु मुंबईच्या प्रवासी संख्येत काहीशी घट झाली. दुसरीकडे दिल्ली विमानाला दीड तास विलंब झाला. इंडिगोचे रात्रीचे मुंबई विमान २ डिसेंबर रोजी अचानक रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ३ ते ५ डिसेंबरदरम्यान मुंबईचे सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील दोन्ही विमाने रद्द झाली. शुक्रवारी मुंबईसह दिल्लीचेही विमान रद्द झाले. परिणामी, प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी तीन दिवसांनंतर सकाळ आणि रात्रीच्या मुंबई विमानाने उड्डाण केले. रात्रीच्या मुंबई छत्रपती संभाजीनगर विमानाने जवळपास पाऊण तास उशिराने मुंबईहून रात्री ८:१५ वाजता 'टेकऑफ' घेतले.

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सक्षम ताटे प्रकरणात अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली.नव्याने अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली .. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी त्याच रात्री सक्षम ताटे याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसह , दोन भावाना अटक केली होती.आता पर्यंत या खून प्रकरणात एकूण आठ आरोपी अटक करण्यात आले. आरोपींना वेळोवेळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले .. आज चार आरोपींना न्यायालयाने , न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यात आँचलचे वडील गजानन मामीलवार , मोठा भाऊ साहिल मामीडवार , सोमेश लाखे , वेदांत कुदळेकर या चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.या चार जनांसह आँचलची आई, आणि अल्पवयीन भाऊ यांना देखील 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आँचलची आई जयश्री मामीडवार हिला तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आंचलच्या अल्पवयीन भावाला सुधारगृहात पाठवण्यात आले.नव्याने अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुणे विमानतळावरून 69 विमानाचे उड्डाणे रद्द

पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द

सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा बसला फटका

पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले

इंडिगो चे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com