Sakshi Sunil Jadhav
भारतीय जेवणातील चपाती म्हणजे हलकी, साधी आणि पचायला सोपी अशी बहुतेकांची समजूत असते. पण गुरुग्रामचे ऑर्थोपेडिक आणि आर्थ्रोस्कोपी तज्ज्ञ डॉ. मनू बोरा यांनी नुकत्याच २५ ऑक्टोबरला केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये रोटी आणि गहू याबाबत धक्कादायक माहिती शेअर केली आहे.
नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास गहू आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, असे ते म्हणतात. डॉ. बोरा यांच्या मते, गहू हे नियमित खाल्ले जाणारे धान्य असून त्याचे दुष्परिणाम सर्वाधिक दिसू शकतात.
साखर किंवा स्वीट्स प्रत्येकजण रोज खात नाहीत. पण गहू मात्र रोज खातात, म्हणून त्याचा शरीरावर परिणाम जास्त असे डॉक्टरांचे मत आहे.
मानवाच्या मूळ आहारात गव्हाचा समावेश नव्हता, त्यामुळे शरीर त्याला नैसर्गिकरीत्या process करत नाही, असे ते सांगतात.
चपातीचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास शरीरात कॅलरी साठत जाते आणि वजन वाढण्याची शक्यता अधिक आहे.
गहू आणि चपातीमुळे रक्तातील साखर पटकन वाढू शकतं, त्यामुळे डायबेटिक किंवा प्री-डायबेटिक लोकांनी अधिक काळजी घ्यावी.
मैदा किंवा रिफाइन्ड गव्हाचे पदार्थ पचनासाठी जड असून त्याचा परिणाम पोटफुगी, वजन वाढ आणि मेटाबॉलिक समस्या वाढवू शकतो.
मोठ्या प्रमाणात चपाती खाणाऱ्यांमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स, थकवा आणि पोटाशी संबंधित समस्या वाढण्याचे डॉक्टर सांगतात. गहू पूर्णपणे टाळणे आवश्यक नाही, पण प्रमाण आणि वारंवारता नियंत्रित ठेवणे गरजेचं आहे.
ही माहिती डॉक्टरांच्या सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. कोणत्याही वैद्यकीय समस्येसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.