7 Bathroom- Toilet Mistake To Avoid  Saam Tv
लाईफस्टाईल

बाथरूम- टॉयलेटमध्ये तुम्हीही या 7 चुका करताय, वेळीच व्हा सावध नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

7 Bathroom- Toilet Mistake To Avoid: टॉयलेटमध्ये आपल्याकडून कळत-नकळत होणाऱ्या ७ चूका ज्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. बाथरुम आणि वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

Manasvi Choudhary

दिवसभरात आपण अनेक वेळा टॉयलेटमध्ये जातो. परंतु, टॉयलेटमध्ये आपल्याकडून काही अशी सवयी घडतात ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो. छोट्या छोट्या सवयींचा परिणााम होतो. या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते सविस्तरपणे जाणून घ्या.

प्लश केल्यानंतर झाकण बंद करा

अनेकांना टॉयलेटमध्ये प्लश केल्यानंतर झाकण न लावण्याची सवय असते. मात्र ही सवय वाईट आहे. पाण्यासोबत अतिशय सू्क्ष्म कण हवेत पसरतात ज्यामध्ये बॅक्टेरिया देखील असू शकतात. यामुळे टॉयलेटमध्ये प्लश केल्यानंतर झाकण बंद करणे महत्वाचे आहे.

टूथब्रश टॉयलेटशेजारी ठेवू नका

जर तुम्ही टॉयलेटशेजावरी तुमच्या क्लिनिंगच्या वस्तू ठेवत असाल तर आरोग्यासाठी अत्यंत घातक असू शकते. तुम्ही वापरत असलेला टूथब्रश कधीही टॉयलेटच्या जवळ ठेवू नका. प्लश केल्यामुळे हवेतील जंतू तुमच्या आजूबाजूच्या वस्तूंवर पसरू शकतात त्यामुळे टॉयलेटपासून टूथब्रश दूर, स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा.

टॉवेल बदला

अनेक आंघोळीचा टॉवेल वर्षानुवर्षे एकच वापरतात मात्र ही सवय चुकीची आहे. ओल्या टॉवेलमध्ये ओलावा टिकून राहतो तसेच त्यावर घाम, त्वचेतील अशुद्धी आणि जंतू जमा झालेले असतात त्यामुळे टॉवेल वापरल्यानंतर बाथरूममध्ये ठेवू नका. टॉवेल २ ते ३ दिवसांनी धुणे महत्वाचे आहे.

एकच साबण सर्वासोबत वापरू नका

अनेक घरांमध्ये प्रत्येकजण आंघोळीसाठी एकच साबण वापरतात. परंतु वैयक्तिक स्वच्छतेसाठी वेगळा साबण वापरणे आरोग्यासाठी योग्य आहे. साबणावर घाण आणि जंतू जमा होऊ शकते यामुळे साबण एकमेकांसोबत वापरणे टाळावे.

हात धुणे

टॉयलेटला गेल्यानंतर हात धुवावे. हात धुताना, बोटांच्या मधली जागा आणि नखांभोवतीचा भाग यासह आपले तळहात पूर्णपणे स्वच्छ करा.

आंघोळीनंतर लूफा ओला ठेवू नका

अनेकजण आंघोळ करताना शरीर स्वच्छ करण्यासाठी लूफाचा वापर करतात. मात्र आंघोळीनंतर तो ओला ठेवणे योग्य नाही. बाथरूममध्ये दमटपणा असतो त्यामुळे ओल्या लूफावर बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते यामुळे आंघोळ केल्यानंतर लूफा पूर्णपणे धुवा आणि हवेशीर ठिकाणी टांगून ठेवा.

टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका

अनेकांना टॉयलेटमध्ये बसून मोबाईल फोन बघण्याची किंवा व्हिडीओ, रिल्स पाहण्याची सवय असते परंतु गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये मोबाईल पाहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसून राहिल्याने गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर दाब येऊ शकतो यामुळे मुळव्याध त्रास वाढू शकतो. म्हणून शौचालयात बसून मोबाईल फोन वापरणे टाळा.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेच्या कामावर पोकलेन अंगावर पडून शेतकरी मजुराचा मृत्यू

सुनेत्रा पवारांना वगळून NCP नेते शाहांच्या भेटीला; वळसे पाटील, मुंडेंचं मंत्रिमंडळात 'कमबॅक' होणार?

78 वर्षांची प्रतीक्षा संपली! पहिल्यांदा ST पाहणारं गाव, ग्रामस्थांचा जल्लोष

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? सुनेत्रा पवारांनी अचानक बोलावली आमदारांची बैठक

भारतासह ५६ देशांची माफी मागणार ब्रिटन; पण नुकसानभरपाई देणार नाही, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT