78 वर्षांची प्रतीक्षा संपली! पहिल्यांदा ST पाहणारं गाव, ग्रामस्थांचा जल्लोष

Dhol-Tasha, Aarti and Celebrations: देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाले... मात्र तरीही एका गावात ST पोहचली नव्हती... पण जेव्हा गावात एसटी आली तेव्हा गावकऱ्यांनी STचं कसं जंगी स्वागत केलयं.. पाहा या स्पेशल रिपोर्टमधून...
Ratnagiri Machal village first ST bus arrival after 78 years
Ratnagiri Machal village first ST bus arrival after 78 yearssaam tv
Published On: 

विशाल सावणे, साम टीव्ही

पहिल्यांदा ST पाहणारं गाव

ढोल ताशाचा आवाज अन् हातात ववाळणीचं ताट घेवून उभ्या असणाऱ्या माय माऊली... ही व्हिडीओ बघितल्यावर तुम्हासनी वाटलं की एखाद्या नेत्याच्या विजयाची मिरवणूक हाय... पण थोड थांबा ही आनंद 78 वर्षात पहिल्यांदाच रत्नागिरीतल्या माचाळ गावाला झालाय... देश स्वातंत्र झाला तवा पासनं या गावानं एसटी बघितली नव्हती... पण आता या गावात एस टी आलीय... . गावात ड्रायव्हर मामा एस्टी घेवून आलं... गावकऱ्यांनी नाचत एस्टीचं वेलमक केलं... एखाद्या नव्या बांधकामाच्या उद्घाटनासाठी लाल रिबीन बांधावी तशीच लाल रिबीन इस्टीच्या उद्घाटनासाठी बांधलीय...

गावात लालपरी आली तसं गावातलं जाणकार पुढं आलं. लालपरीला हार घातला... इस्टीसमोर नारळ फोडला....माय माऊलींनी इस्टीला ववाळलं... अन् डायव्हर मामाचं औक्षण सुधीक केलं... गावातल्या मंडळीनं एस्टी समोर उभा राहून फुटू सुधा काढला... ह्यो आनंद कायमच मनात साठवून ठेवण्यासाठी ह्यो फोटू हाय...

आज अनेकांकडं मोठ्या मोठ्या गाड्या हायईत... अनेक जणं इमानानं या राज्यातनं त्या राज्यात अन् या देशातनं त्या देशात प्रवास करत्यात पण आजही लोकांचा विश्वास इस्टीवर असल्याचं या व्हिडीओतनं दिसून आलंय... असो शेवटी काय तर एसटीनं आपलं ब्रीद वाक्य खरं केलं "प्रवाशांच्या सेवेसाठी"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.