

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीची तयारी म्हटलं की घराची साफसफाई हा प्रश्न पहिलाच येतो. भिंतीना रंग काम करणे दारे-खिडक्या पुसणे, किचनची आवराआवर करणे ही कामे दिवाळीआधी करायची असतात. मात्र अनेकदा बिझी शेड्यूलमुळे किंवा कमी खर्चामुळे भितींना रंग देण्याचे काम शक्य होत नाही अशावेळी काळजी करण्याची गरज नाही.
भितींवर धूळ, हाताचे ठसे, तेलाचे डाग किंवा लहान मुलांचे पेनचे ओरखडे दिसतात यामुळे ऐन सणासुदीला घर कितीही सजावले तरी स्वच्छ दिसत नाही. अशावेळी रंग काम करणे शक्य होत नसेल तर तुम्ही अवघ्या एका दिवसात भितींवरील डाग साफ करायचे आहेत. यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे ते स्टेप बाय स्टेप या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
१. भांडी धुण्याचे लिक्विड आणि कोमट पाणी
एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात २ चमचे भांडी धुण्याचे लिक्विड किंवा डिटर्जंट मिक्स करा. एक मऊ सुती कापड या पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि भिंतीवरील धुळीच्या व हाताच्या डागांवर हलक्या हाताने घासा. जास्त जोर लावून भिंती घासू नका, अन्यथा भिंतीचा रंग निघू शकतो.
२. बेकिंग सोड्याची पेस्ट
स्वयंपाकघरातील भिंतींवर फोडणीचे किंवा तेलाचे चिकट डाग पडतात. यासाठी २ चमचे बेकिंग सोड्यात थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावा, १० ते १५ मिनिटे राहू द्या आणि नंतर ओल्या कापडाने हलक्या हाताने पुसून काढा.
३. व्हिनेगर आणि पाण्याचा स्प्रे
दमट वातावरणामुळे भिंतींवर काळी बुरशी जमा होते यासाठी तुम्ही व्हिनेगरचा घरगुती उपाय करू शकता. एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. बुरशी असलेल्या जागेवर स्प्रे करा, १० मिनिटांनी कोरड्या व स्वच्छ कपड्याने पुसून टाका.
४. टूथपेस्टचा चमत्कार
लहान मुलांनी भिंतींवर स्केचपेन, पेन्सिल किंवा क्रेयॉनने गिरवले असल्यास जुन्या टूथब्रशवर थोडी व्हाईट टूथपेस्ट लावा आणि डाग असलेल्या ठिकाणी हलक्या हाताने घासा. डाग निघून गेल्यावर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.
५. टच-अप पेंट किंवा क्रिएटीव्ह वॉल स्टिकर्स:
जर भिंतीवरचा डाग खूपच जुना आणि हट्टी असेल किंवा तिथले प्लास्टर उखडले असेल, तर ते लपवण्यासाठी बाजारात मिळणारे 'टच-अप पेंट' किंवा डिझायनर 'वॉल स्टिकर्स' वापरा. यामुळे भिंती पुन्हा नव्यासारख्या चमकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.