Water Bottle Designs Secrets: पाण्याच्या बाटल्यांवर नागमोडी रेषा का असतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण

Manasvi Choudhary

पाण्याची बाटली

प्रवासात, ऑफिसात किंवा घराबाहेर असताना तहान लागल्यावर आपण दुकानातून पाण्याची प्लॅस्टिकची बाटली विकत घेतो, पाणी पितो आणि ती फेकून देतो.

Water Bottle Designs Secrets

पाण्याच्या बाटल्यांवरील नागमोडी रेषा का असतात?

पण आपण कधी विचार केला आहे का की, या पाण्याच्या बाटल्या पूर्णपणे गुळगुळीत आणि सपाट नसून त्यावर नागमोडी रेषा असतात, या रेषा का असतात यामागील कारण या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Water Bottle Designs Secrets

रिबिंग किंवा ग्रिपिंग रिजेस

पाण्याच्या बाटल्यांवर असलेल्या या नागमोडी रेषांना तांत्रिक भाषेत रिबिंग किंवा ग्रिपिंग रिजेस म्हटले जाते. बाटल्यांची निर्मिती करताना 'ब्लो मोल्डिंग' प्रक्रियेदरम्यान या विशिष्ट डिझाईन्स तयार केल्या जातात.

Ribbing or Gripping Ridges

पातळ प्लास्टिकला मजबूती देणे

पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक अतिशय पातळ आणि हलके असते. जर बाटली पूर्णपणे सपाट असती, तर ती अतिशय कमकुवत झाली असती आणि सहज मुरगळली असती किंवा फुटली असती. या नागमोडी रेषा पातळ प्लास्टिकला आवश्यक कडकपणा आणि मजबूती देण्याचे काम करतात.

Structural Strength

बाटलीची पकड मजबूत होणे

अनेकदा हाताला घाम आल्यामुळे किंवा बाटली थंड असल्यामुळे ती हातातून निसटण्याची शक्यता असते. परंतु, या नागमोडी रेषांमुळे हाताची बाटलीवरील पकड अत्यंत घट्ट आणि मजबूत होते, ज्यामुळे ती सहज घसरत नाही.

Better Grip

बाटलीचा आकार कायम राखणे

या नागमोडी रेषांमुळे बाटलीवर दाब पडल्यास ती चपटी होत नाही किंवा तिचा आकार बिघडत नाही तर साध्या डिझाईनच्या तुलनेत या रेषांमुळे बाटलीचा टिकाऊपणा वाढतो.

Better Grip

NEXT: Vastu Tips For Kitchen: स्वयंपाकघरामध्ये मीठ, हळद आणि तांदूळ कुठे ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य जागा कोणती?

Vastu Tips For Kitchen
येथे क्लिक करा...