Vastu Tips For Kitchen: स्वयंपाकघरामध्ये मीठ, हळद आणि तांदूळ कुठे ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य जागा कोणती?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले गेले आहे. स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसून ते घरातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि माता अन्नपूर्णा देवीशी जोडलेले असते.

Kitchen | pinterest

मीठ, हळद आणि तांदूळ कुठे ठेवावे?

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रोजच्या वस्तू जसे की मीठ, हळद आणि तांदूळ यांचा थेट संबंध आपल्या ग्रहांशी आणि ऊर्जेशी असतो. या वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहते.

Kitchen Vastu Tips

मीठ ठेवण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात मीठ नेहमी नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. मीठ हे माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते आणि ते घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. मीठ ठेवण्यासाठी कधीही प्लॅस्टिकची किंवा लोखंडाची भांडी वापरू नयेत. मी नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे.

salt | pinterest

हळद ठेवण्याची योग्य दिशा

हळद ही देवगुरु गुरू ग्रहआणि माता लक्ष्मीशी संबंधित आहे. वास्तुशस्त्रात हळद उत्तर दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. हळद साठवण्यासाठी पितळ, तांबे किंवा काचेचे भांडे वापरावे, ज्यामुळे घरात शुभ परिणाम दिसून येतात.

Turmeric Placement | Saam TV

तांदूळ आणि अन्नधान्याची योग्य दिशा

तांदूळ हा अन्नपूर्णा देवी आणि चंद्राशी संबंधित मानला जातो. स्वयंपाकघरात तांदूळ आणि इतर धान्य नेहमी नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. यामुळे घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही.

Rice | yandex

महत्त्वाची खबरदारी

वास्तुशास्त्रानुसार मीठ, हळद किंवा तांदूळाचे भांडे कधीही पूर्णपणे रिकामे ठेवू नये. भांडे संपण्यापूर्वीच त्यात पुन्हा भरणा करावा. भांडे रिकामे ठेवल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

Important Rule | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Black Rice Benefits: पांढरे तांदूळ सोडून लोक का खाताहेत काळा तांदूळ, फायदे वाचून थक्क व्हाल

Black Rice Benefits
येथे क्लिक करा...