Black Rice Benefits: पांढरे तांदूळ सोडून लोक का खाताहेत काळा तांदूळ, फायदे वाचून थक्क व्हाल

Manasvi Choudhary

भात

भात हा आहारातील महत्वाचा घटक आहे. भात खाल्ल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही.

Rice | pinterest

पांढरा तांदूळ

आपल्या सर्वांच्या घरात सहसा पांढरा तांदूळाचा भात बनवतात. परंतु, आता सध्या काळा तांदूळ खाण्याला पसंती देत आहेत.

rice | yandex

काळा तांदूळ म्हणजे काय? आणि त्याचे फायदे जाणून घ्या

काळ्या तांदळाचा गडद काळा किंवा जांभळा रंग हा 'अँथोसायनिन्स' या अँटीऑक्सिडंटमुळे असतो. जे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्स लढण्यास मदत करते.

Black Rice Benefits

उच्च फायबर आणि वजन नियंत्रण

पांढऱ्या तांदळावर जास्त पॉलिश केलेली असते, ज्यामुळे त्यातील फायबर नष्ट होते. याउलट, काळ्या तांदळात पॉलिश कमी असल्याने भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, वारंवार भूक लागत नाही आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

Weight Loss & High Fiber

मधुमेहासाठी फायदेशीर

पांढऱ्या तांदळाचा ग्लॅयसेमिक इंडेक्स (GI) खूप जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते. परंतु, काळ्या तांदळाचा ग्लॅयसेमिक इंडेक्स कमी असतो. यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तामध्ये साखर हळूहळू शोषली जाण्यास मदत करतात, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Diabetes Friendly

ग्लूटेन-फ्री

हा तांदूळ नैसर्गिकरीत्या ग्लूटेन-फ्री असतो, त्यामुळे ज्या लोकांना ग्लूटेनची ॲलर्जी आहे किंवा पचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी बेस्ट आहे.

Gluten-Free

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा आहारात मोठा बदल करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Blood Donation Tips: रक्तदान केल्यानंतर शरीरात नेमके काय घडते? तुम्ही करत असलेल्या 'या' चुका ठरू शकतात जीवघेण्या

Weak memory causes
येथे क्लिक करा...