Manasvi Choudhary
रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. एका व्यक्तीने केलेले रक्तदान हे अनेकांचे जीव वाचवू शकतो.
परंतु, रक्तदान केल्यानंतर शरीराची योग्यरित्या काळजी घेणे महत्वाचे आहे. रक्तदान केल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात ते बदल नेमके कोणते ते या वेबस्टोरीजमधून जाणून घ्या.
रक्तदानाच्या वेळी शरीरातील रक्तपेशीतून रक्त बाहेर पडते त्यानंतर शरीरात सुमारे २४ ते ३६ तासांमध्ये नवीन रक्त तयार होते. शरीरात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनची पातळी भरून काढण्यासाठी वेळ लागतो.
रक्तदान केल्यानंतर लगेचच खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे रक्तदाब अचानक कमी होऊन चक्कर येऊ शकते.
रक्तदान केल्यानंतर लगेचच जड वस्तू उचलल्यास किंवा व्यायाम केल्यास रक्तस्त्राव, सूज किंवा मोठी गाठ तयार होऊ शकते यामुळे काळजी घ्या.
रक्तदान केल्यानंतर शरीरात द्रवपदार्थांची कमतरता असल्यास डिहायड्रेशन होऊन मळमळ आणि चक्कर येऊ शकते यामुळे रक्तदान केल्यानंतर जास्त पाणी आणि द्रवपदार्थ प्या.
रक्तदान केल्यानंतर किमान १० ते १५ मिनिटे विश्रांती घ्या आणि ज्यूस, पाणी किंवा हलका नाश्ता घ्या.
पुढील २४ तास अल्कोहोल आणि धुम्रपान पूर्णपणे टाळा.
सुई टोचलेल्या जागी सौम्य वेदना किंवा निळसर डाग पडल्यास बर्फाने शेका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.