7 Best Hair Oil For Hair Growth: लांब आणि दाट केसांसाठी फक्त नारळ तेलच नाही तर हे 7 तेल देखील ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

आजकाल बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, तणाव आणि केमिकल युक्त हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर यामुळे केस गळणे, टाळूवर कोंडा होणे, केस कोरडे होणे आणि मुळांपासून कमकुवत होणे या समस्या सामान्य झाल्या आहेत.

Hair Loss

केसांची वाढ सुधारते

अनेक लोक केसांसाठी केवळ खोबरेल तेलच लावतात. परंतु, केसांची वेगाने वाढ होण्यासाठी आणि त्यांचा पोत सुधारण्यासाठी खोबरेल तेलाव्यतिरिक्त इतरही अनेक गुणकारी नैसर्गिक तेल आहेत जे तुम्ही वापरू शकता.

Long Hair Tips

बदाम तेल

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मऊ, रेशमी आणि चमकदार बनवते.

Almond Oil | meta ai

एरंडेल तेल

एरंडेल तेल केसांना लावल्याने टाळूतील रक्ताभिसरण वाढवते. हे तेल थोडे घट्ट असल्याने खोबरेल तेलात मिसळून लावल्यास नवीन केस वेगाने उगवतात.

Castor Oil | saam tv

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे तेल कोरड्या आणि कुरळ्या केसांना खोलवर कंडिशनिंग करून त्यांना मऊ व मुलायम ठेवण्यास मदत करतो.

Olive Oil | pinterest

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल थेट न लावता खोबरेल तेलात ३-४ थेंब मिसळून लावल्यास टाळू स्वच्छ होतो आणि कोंड्याची समस्या दूर होते.

Tea Tree Oil | pinterest

आर्गन तेल

आर्गन तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे तेल केसांना लावल्याने फाटे फुटलेले केस गळणारे केस रोखण्यासाठी उत्तम काम करते.

Argan Oil

लव्हेंडर ऑइल

लव्हेंडर ऑइल केसांची गळती थांबवून नवीन केस उगवण्यास मदत करते.

Lavender Oil | Google

जॉजोबा ऑइल

जॉजोबा ऑइल टाळूतील नैसर्गिक तेलासारखेच काम करते. हे तेल टाळूमध्ये सहज शोषले जाते आणि केसांचा कोरडेपणा दूर करते.

Jojoba Oil | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Milk Or Paneer: दूध आणि पनीर खरे आहे की बनावट? घरीच ओळखा या 4 सोप्या टिप्सने

how to identify adulterated Paneer at home
यैेथे क्लिक करा...