Manasvi Choudhary
आजकाल दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. जास्त फायदा होण्यासाठी अनेकजण पदार्थांमध्ये भेसळ करतात.
यासाठी दूध आणि पनीर यामध्ये भेसळ आहे की नाही खरे आणि बनावट दुध आणि पनीर घरच्या घरी तुम्ही ओळखा.
दूध तापवताना किंवा ढवळताना जर त्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात फेस येत असेल, तर त्यात डिटर्जंट किंवा कॉस्टिक सोडा मिसळला असू शकतो याची तपासणी करा.
जर तुम्ही पनीर हाताने थोडे दाबले तर त्याचा सहज चुरा होत असेल तर ते शुद्ध पनीर असू शकत. बनावट किंवा सिंथेटिक पनीर हाताने दाबल्यास सहजासहजी तुटत नाही, उलट ते रबरासारखे ताणले जाते.
पनीरचे तुकडे पाण्यात उकळून थंड करा. त्यानंतर त्यावर आयोडीन सिरपचे २ ते ३ थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा झाला, तर त्यात स्टार्च, आरारोट किंवा पिठाची भेसळ केलेली असू शकते.
शुद्ध दूध उकळल्यानंतर त्याचा रंग पांढराच राहतो. परंतु, जर दूध उकळल्यानंतर किंवा साठवून ठेवल्यानंतर पिवळसर होत असेल तर त्यात केमिकलची भेसळ असू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.