Onion Buying Tips: कांदे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाचे 5 नियम!

Manasvi Choudhary

कांदा

कांदा हा आहारातील महत्वाचा घटक मानला जातो. परंतु, बाजारातून कांदा खरेदी करताना जर योग्य काळजी घेतली नाही, तर आर्थिक आणि आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

Onion Buying Tips

कांदा खरेदी करण्याच्या टिप्स

कांदा खरेदी करताना त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. ताजे, दर्जेदार आणि टिकणारे कांदे निवडण्यासाठी काही सोप्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Onion Buying Tips

कांद्याची साल आणि कोरडेपणा

कांदा निवडताना त्याची बाहेरील साल कागदासारखी कोरडी आणि कुरकुरीत असली पाहिजे. ती सहजपणे निघेल अशी असावी. जर साल ओलसर असेल, तर तो कांदा लवकर सडण्याची शक्यता असते.

Dry Paper-like Skin

कडक आणि घट्टपणा तपासा

कांदा खरेदी करताना तो हातात घेऊन हलकासा दाबून तपासावा. उत्तम दर्जाचा कांदा हातात घेतल्यावर पूर्णपणे घट्ट आणि कडक लागला पाहिजे. जर तो बोटाने दाबल्यावर आत दबला, तर याचा अर्थ तो आतून सडलेला किंवा पोकळ असू शकतो.

Firmness

कोंब आलेले कांदे टाळावे

अनेकदा बाजारात कांद्यांना हिरवे कोंब फुटलेले असतात. कांद्याला कोंब आल्यानंतर त्यातील ओलावा आणि सर्व पोषण तत्वे कमी होतात, ज्यामुळे त्याची चव पूर्णपणे बदलते. असे कांदे विकत घेणे टाळावे.

Avoid Sprouted Onions

ओलावा आणि बुरशीपासून सावध राहा

हिरवे किंवा ओले पडलेले कांदे कधीही घेऊ नका. तसेच कांद्यावर काळी पावडर किंवा बुरशी दिसल्यास आणि त्यातून मंद वास येत असल्यास ते कांदे खराब झालेले असतात.

onion | pinterest

योग्य साठवणूक

बाजारातून कांदे पिशवीत आणल्यानंतर तसेच बंद ठेवू नका. त्यांना हवेशीर जागी मोकळे ठेवावे, जेणेकरून ओलावा साचणार नाही आणि कांदे दीर्घकाळ टिकतील.

Onion Buying TIPS

NEXT: Treadmill Walking Vs Outdoor Walking: ट्रेडमिलवर चालणे की बाहेर चालणे, आरोग्यासाठी काय बेस्ट?

Treadmill Walking vs. Outdoor Walking
येथे क्लिक करा....