Manasvi Choudhary
चालणे हा निरोगी आरोग्यासाठी बेस्ट व्यायाम आहे. रोज नियमित चालण्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीरातीची ऊर्जा वाढते
मात्र, आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना प्रश्न पडतो की ट्रेडमिलवर चालणे अधिक फायदेशीर आहे की बाहेर मोकळ्या हवेत चालणे?
पाऊस, तीव्र ऊन किंवा कडाक्याची थंडी असो, तुम्ही घरच्या घरी किंवा जिममध्ये व्यायाम करू शकता.
ट्रेडमिलचा सरफेस फ्लॅट आणि शॉक-ॲब्जॉर्बिंग असतो, ज्यामुळे गुडघे आणि सांध्यांवर कमी ताण पडतो. यात तुम्ही वेग , चढ- उतार आणि अंतर हे कंट्रोलमध्ये ठेवू शकता.
निसर्गाच्या सानिध्यात आणि मोकळ्या हवेत चालल्याने स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि मानसिक आरोग्य सुधारते.
सकाळी बाहेर चालल्याने सूर्यप्रकाशातून शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी गरजेचे असते.
बाहेर चालताना चढ-उतार, वळणे, हवामानातील बदल यामुळे शरीराच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि जास्त कॅलरीज बर्न होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.