Manasvi Choudhary
महिलांमध्ये लिनन साड्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. सणासुदीसाठी सिंपल आणि सोबर लिनन साड्या सुंदर दिसतात.
तुम्हालाही दिवाळीसाठी खास लिनन साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स पाहूया.
साडीवर जरीची बॉर्डर असेल तर साडी उठून दिसते तुम्ही देखील यंदा दिवाळीसाठी खास लिनन साडी निवडा.
आजकाल डिजिटल प्रिंट्स साड्यांचा ट्रेंड आहे यासाठी तुम्ही लिनन सांड्यामध्ये डिजिटल प्रिंट्स पॅटर्न निवडा.
फुलांच्या डिझाईन्समध्ये तुम्ही लिनन साडी निवडू शकता. पेस्टल रंगांवर फुलांची बारीक नक्षी असणाऱ्या लिनन साड्या अत्यंत सुंदर आहेत.
तुम्हाला सणासुदीनिमित्त हेवी लूक हवा असेल तर सिल्कच्या लिनन साड्या निवडा. यामध्ये अनेक पॅटर्न आणि डिझाईन्स आहेत.
ज्या महिलांना युनिक फॅशन आवडते, त्यांच्यासाठी हाताने केलेले बारीक नक्षीकाम किंवा थ्रेड वर्क असलेल्या लिनन साड्या बेस्ट आहेत.