Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Stunt Video: स्टंट की मृत्यूला निमंत्रण? रील बनविण्यासाठी तरूण भररधाव कारला लटकला; थरारक VIDEO व्हायरल

Youth Hang To Moving Car Video Viral: भररस्त्यात कारला लटकून स्टंटबाजी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Rohini Gudaghe

तरूणाने भररस्त्यात वेगात धावणाऱ्या कारला लटकून स्टंटबाजी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया समोर येत (Youth Hang To Moving Car) आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. रील बनविण्यासाठी जीवाशी खेळलं जात असल्याचं व्हिडिओ बघून वाटत आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण एका आलिशान कारमध्ये बसले आहेत. एक तरूण कारला बाहेरून लटकत असल्याचं दिसत आहे. या व्यक्तीला कारच्या बाहेरच्या बाजूने सेलोटेपने बांधलेलं दिसत (Stunt Video) आहे. गाडी रस्त्यावर फिरत आहे आणि तिघेही मजा घेत आहेत. या तिघांना ज्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा होता, तो बनवण्यात यश आल्याचं दिसतंय.

केवळ रील बनवण्यासाठी या लोकांनी हे स्टंट केल्याचं व्हिडिओ (Stunt Video Viral) पाहिल्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, स्टंटमध्ये वापरण्यात आलेल्या कारची नंबर प्लेट दिसत नाही. या व्हिडिओवर कॉमेंट सेक्शन देखील चालू नाही. हा व्हिडिओ सुमित दुबे नावाच्या व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.

त्यावरून सुमित दुबे प्रयागराजचा रहिवासी असल्याची माहिती मिळत (Viral News) आहे. 'जो लोग डरकर जिंदगी गुजारते है, वो लोग जिनाही शुरू नहीं करते' असं म्युझिक या व्हिडिओला देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9 कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 20 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं (Car Video) आहे.

रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोकं जीव धोक्यात घालत असल्याचं दिसत आहे. असे अनेक व्हिडिओ (Viral Video) आजपर्यंत समोर आले आहेत. ज्यामध्ये लोकांनी त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून रील बनवली आहे. आता असाच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला (Stunt Video Viral) पाहून 'हा स्टंट नसून मृत्यूची मेजवानी आहे' असं म्हणता येईल. आजवर आपण रील बनविण्याच्या नादात लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT