video viral
Snake Viral VideoSaam TV

Snake Viral Video : बापरे बाप! बिल्डिंगमध्ये घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये शिरला साप; पायात घालताच जे घडलं, ते भयंकरच

Snake in shoes video viral : एका व्यक्तीच्या चक्क श्युजमध्ये साप आढळला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ त्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Published on

उन्हाळ्यात तापमान वाढल्याने अनेक कीटक आणि सरपटणारे प्राणी जमिनीवर आणि मानवी वस्तीत आढळून येतात. अशात एका व्यक्तीच्या चक्क श्युजमध्ये साप आढळला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ त्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल.

video viral
Viral Video: दुबईच्या पुरातून बाहेर काढण्यासाठी अप्रतिम बिझनेस आयडिया; चक्क शॉपिंग कार्टमध्ये बसवून लोकांना नेले बाहेर

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सोसायटीमध्ये घराबाहेर काही व्यक्तींनी आपले श्युज भिंतीला उभे करून ठेवले आहेत. बूट पायात घालण्याआधी हा व्यक्ती त्याकडे नीट पाहतो तेव्हा त्यामध्ये काही हालचाल जाणवते. त्यामुळे तो लांब उभा राहून काठीने बुट खाली पाडतो. बूट खाली पडताच त्यातून सापाची शेपटी दिसते. हे दृश्य पाहून या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकते.

साप पाहून अनेक व्यक्ती आरडाओरडा करतात, धावपळ करतात. मात्र अशावेळी शांत राहून सापाला रेस्क्यू करत निसर्ग अधिवासात सोडणे गरजेचे असते. आता या व्यक्तीने देखील शांततेत सापावर लक्ष ठेवलं. त्यानंतर सर्प मित्रांच्या मदतीने सापाला बाहेर काढलं आहे. तसेच निसर्ग अधिवासात सोडून दिलंय.

सोशल मीडियावर @invicibal_ajita या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच यावर सावधान राहा, सतर्क राहा आणि आपली काळजी घ्या असं कॅपश देण्यात आलं आहे. आपली सावधानी ही आपली जबाबदारी आहे असं देखील यावर लिहिण्यात आलं आहे. हा साप विषारी नाही असं एका नेतकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर आणखी एकाने हसण्याचे ईमोजी पाठवत सापांना श्युज फार आवडतात असं म्हटलं आहे.

आता असा प्रसंग कधीही आणि कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकतो. खोलगट किंवा पोकळ असलेल्या अशा वस्तू वापरताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. गावी खेड्यापाड्यात सर्वत्र झाडी असते. त्यामुळे येथे अशा प्रकारचे साप, विंचू लपून बसलेले असतात. दुर्लक्ष केल्यास अशा गोष्यींमुळे जीव जाण्याची शक्यता असते.

video viral
Andhra Pradesh News: लग्न मंडपात तुफान राडा, प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला कुटुंबियांनी फरफटत नेलं; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com