आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून, तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी अनेकजण सोशल मीडियावर विविध व्हिडिओ पाहतात, जे त्यांना आनंद देतात. सध्या एका वृद्ध व्यक्तीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो उत्साहाने नाचताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून लोक आनंदी होत आहेत आणि सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हिडीओमध्ये स्टेजवर अनेक तरुण मुले-मुली नाचताना दिसतात, पण जसजसे प्रभुदेवाचे गाणे सुरु होते तसतसे एक वृद्ध काक लुंगी बांधून स्टेजवर येतात आणि जबरदस्त डान्स करतात. त्यांच्या उत्साही हालचाली आणि दमदार ऊर्जा पाहून प्रेक्षक खूश होतात. त्यांच्या नृत्यातील सहजता आणि आनंदामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि लोक त्यांचे कौतुक करत आहेत.
स्टेजवर अनेक तरुण नाचत असले तरी, या वृद्ध काकांच्या उत्साही डान्ससमोर ते सारे फिके वाटतात. हे काका आपल्या तालात हरवून नृत्य करताना तुम्ही पाहू शकता. ज्याचा आनंद गायकांसह प्रेक्षकही घेत आहेत. त्यांच्या ऊर्जेने भरलेल्या नृत्यशैलीने सोशल मीडिया यूजर्सची मने जिंकली आहेत. हा धमाकेदार व्हिडिओ 'mehzaayzal__' या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ९ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सोशल मिडिया यूजर्सही या वृद्ध काकांच्या उत्साही नृत्याचे भरभरुन कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, काका त्यांचे सर्वोत्तम आयुष्य जगत आहेत, तर दुसऱ्याने म्हटले, वय म्हणजे फक्त एक संख्या! आणखी एका युजरने लिहिले, या तरुणांपेक्षा काकांचा डान्स खूपच भन्नाट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.