Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : अर्रर्र! रील व्हिडिओ काढताना मागे लागला मोर; तायडी घाबरून पळतच सुटली, पाहा व्हिडिओ

Girl Scared of the Peacock : मोर पहावा, त्यासोबत रील व्हिडिओ किंवा फोटो काढावा, असं अनेकांना वाटत असेल. अशात सोशल मीडियावर मोर आणि एका तरुणीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी प्रत्येकाला आवडतात. पक्षांसोबत व्हिडिओ किंवा फोटो काढावेत असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी अनेक जण विविध अभयारण्याला भेट देतात. भारतातील सर्वात सुंदर पक्षी मोर मानला जातो. मोर हा राष्ट्रीय पक्षी देखील आहे. मोर पहावा, त्यासोबत रील व्हिडिओ किंवा फोटो काढावा, असं अनेकांना वाटत असेल. अशात सोशल मीडियावर मोर आणि एका तरुणीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी एका ठिकाणी फिरण्यासाठी निघाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी आहे. त्यामुळे तेथून काही अंतरावर एक मोर येतो. मोर पाहून या तरुणीला त्याच्यासोबत सेल्फी आणि रील व्हिडिओ शूट करण्याचा मोह होतो. त्यामुळे ती कारमधून बाहेर येते आणि शांत मोराकडे जाण्यासाठी चालू लागते. मोर सुद्धा तरुणीला पाहून घाबरत नाही. तो आपल्याच धुंदीत मग्न असतो.

तरुणी या मोराजवळ जाते आणि आपल्या गुडघ्यावर बसते. त्यावेळी मोर देखील तिच्याजवळ येतो. मोरासोबत ती काही वेळ घालवते. सुंदर फोटो काढते. मोराशी गप्पा गोष्टी करते. मोराबरोबर खेळून झाल्यावर ती पुन्हा आपल्या घरी निघते. मात्र यावेळी मोर काही तिचा पिछा सोडत नाही. मोर तरुणीच्या मागे मागे येऊ लागतो.

मोर समोर आल्यावर आणि तो आपला पिछा सोडत नाही हे पाहून तरुणी घाबरते. ती मोराला आपल्या ओढणीने दूर करते. मात्र मोर तरीही तिच्या मागे मागे येऊ लागतो. त्यावर तरुणी इतकी घाबरते की, ती थेट रस्त्यावर पळत सुटते. तरुणी पुढे पळत असते आणि मोर तिच्या मागे पळत असतो. तरुणी पळतपळत थेट कारमध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते.

मोर सुद्धा तिच्या मागे पळत कारपर्यंत पोहचतो. आता व्हिडिओमध्ये तरुणी मोराला घाबरलेली दिसत आहे. मात्र खरंतर येथे मोराला तिला लळा लागलेला असावा. त्यामुळे या तरुणीने आणखी काही वेळ आपल्यासोबत थांबावं, आपल्याला खाण्यासाठी द्यावं, असं त्याच्या मनात येत असावं. या व्हिडिओवर आता अनेक कमेंट्स येत आहेत.

एखाद्याला जीव लावला त्यावर प्रेम केलं की असंच होतं, अशी कमेंट एकाने केली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी पाठवलेत, तर काहींनी यावर दोघांमधील नात्याबद्दल कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT