Moment the man lost his balance while proposing at a scenic waterfall captured just before he slipped into the water Saam Tv
व्हायरल न्यूज

धबधब्यावर प्रपोज करणं ठरलं धोकादायक! तरुण थेट खाली… थरकाप उडवणारा व्हिडीओ

Romantic Proposal Fail: प्रेमिकेला धबधब्यावर प्रपोज करत असताना तरुणाचा अचानक तोल गेल्याने तो वाहत्या पाण्यात पडला. हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक थरारक आणि हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. बरेच तरुण-तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हटके ठिकाणांची निवड करतात. अशाच एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला एका धबधब्याच्या ठिकाणी प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा क्षण जितका सुंदर वाटावा, तितकाच तो जीवघेणा ठरला. प्रेमाचा हा क्षण काही सेकंदांतच एका थरारक अपघातात रूपांतरित झाला.

घटना नेमकी काय घडली?

व्हायरल(Viral) व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी धबधब्यावर घेऊन जातो. भोवतालचं निसर्गसौंदर्य शिवाय धबधब्याचा आवाज आणि त्या दोघांचे हसरे चेहरे हे सर्व दृश्य एखाद्या सिनेमातील सीनप्रमाणे भासतं आहे. मात्र, हे सौंदर्य काही क्षणातच भयभीत करणाऱ्या घटनांमध्ये बदलून जातं.

प्रपोज करताच तरुणीच्याही चेहऱ्यावर आनंदाची लाट उमटते असे सर्व व्हिडिओत दिसत आहे. पण अचानक तो तरुण थोडं मागे सरतो आणि त्याचा तोल जातो. काही कळायच्या आत तो पाय घसरून थेट धबधब्याच्या वाहत्या पाण्यात कोसळतो. त्याचा ओरडण्याचा आवाज आणि गर्लफ्रेंडचा भयभीत चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हादरतात.

नक्की ही घटना कधीची आहे आणि कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. हा व्हिडिओ(Video) सध्या एक्सवरील @MarchUnofficial या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून यावर अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलंं की,''भावाचं नशीबच खराब आहे'' दुसऱ्या यूजरने म्हटल,''आता लग्न करतोय की नाही काय माहिती'' अशा अनेक मजेशीर तर काहींनी हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT