Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: असलं धाडस नको! पुराच्या पाण्यात दुचाकी टाकणं अंगलट; तरुण वाहून जातानाचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या सोलापूर जिल्हातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात दोन फूट पाण्यातून मोटारसायकल नेताना तरुण वाहून गेलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Solapur Shocking Video: गेल्या आठवड्यापासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वत्र पुरजन्य परिस्थिती दिसून येत आहे. अशा पुराच्या पाण्यात अनेकांना त्यांच्या मस्तीमुळे जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण अडकून बसलेले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात एका व्यक्तीला मोटारसायकल घेऊन जाताना तो वाहून गेलेला आहे. सध्या या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की संपूर्ण एका बांधाऱ्याजवळील परिसर दिसून येत आहे. या बांधाऱ्यावर एक पुलही दिसत आहे. मात्र बांधाऱ्याच्या पाण्यातून वाहत जाताना एक तरुण दिसत आहे. जो मदतीसाठी ओरडत आहे. मात्र पाण्याचा प्रवाह (Flow)इतका जोरदार होता की, बांधाऱ्यावर जमलेल्या लोकांनाही काही करता येत नव्हते. मात्र पाहता पाहता तरुण त्या पाण्यातू वाहत जातो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यातील आहे. जिथे उजनी धारणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच अल्ताफ तांबोळी हा तरुण आळगी बांधाऱ्यावरून कर्नाटककडे जाण्याचा प्रयत्न करत होता. जाताना त्याने तब्बल दोन फूट पाण्यातून मोटारसायकल नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पाण्याच्या प्रवाहात तो दुचाकीसह वाहून गेला आहे. तरुण वाहून गेल्यानंतर रात्रभर त्याचा शोध सुरु होता परंतू अद्याप त्याच पत्ता लागलेला नाहीये. अक्कलकोट ग्रामीण पोलीस आणि हैद्रा ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@saamtv' या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स आणि आणि अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mulyachi Bhaji Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा गावाकडे बनवतात 'तशी' मुळ्याची भाजी, वाचा खास रेसिपी

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT