8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बदलणार ही योजना

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगाआधी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकारी स्वास्थ्य सेवा योजनेच्या नियमात बदव केल जाऊ शकतो.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

आठव्या वेतन आयोगाआधी या योजनेत होणार महत्त्वाचा बदल

स्वास्थ्य योजनेच्या निधी वाढवण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या समितीने शिफारसी सादर केल्यानंतरच पगारवाढ केली जाणार आहे. शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे १८ ते २० महिन्यांपर्यंत यै शिफारसी सादर केल्या जाऊ शकतात.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

आठवा वेतन आयोग लागू करण्याआधी वेतन आयोगासमोर डिमांड ड्राफ्ट दिला जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या स्वास्थ योजनेबाबत माहिती असणार आहे. केंद्र सरकार स्वास्थ्य सुरक्षा योजनेत महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे.

काय बदल होणार?

केंद्र सरकारच्या स्वास्थ योजनेत CGHS पासून वंचित शहरातील कर्मचाऱ्यांना सध्या १००० रुपये मासिक भत्ता दिला जातो. दरम्यान, नॅशनल काउंसिल NC-JCM च्या २५ फेब्रुवारी २०२६ बैठकीत मागणी करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांनी यात बदल करुन २०,००० करण्याची मागणी केली आहे.

CGHS अंतर्गत सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना कॅशलेश उपचार, ओपीडी, औषधे, डायग्नोस्टिक सेवा मिळते. मागच्या काही वर्षांपासून औषधांच्या किंमती, सुपर स्पेशलिटी उपचारांच्या किंमतीत वाढ होत आहे. यामुळेच त्यानुसार वेतनात बदल करण्याची मागणी केली जात आहे.

सध्या CGHS योगदानाचा दर हा वाढवण्याची मागणी केली जात आहे. वाढत्या महागाईमुळे ही मागणी केली जात आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख आली समोर

आठव्या वेतन आयोगाआधी हा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामध्ये हा महत्त्वाचा बदल केला जाऊ शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: ₹५७,००० बेसिक सॅलरी, वर्षाला ७ टक्के पगारवाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com