Viral Video News : पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं अंगलट; शेतकऱ्यासह ५ जण बुडाले; धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर कायम पुरजन्य परिस्थितीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या पुराच्या पाण्यातू जाताना एक मोठा अपघात झालेला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे.
Viral Video
Viral Video News Saam Tv
Published On

सध्या महाराष्ट्रासह सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहर, पुणे, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह सर्व महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पडणारे पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धरणे काठोपाठ भरली आहे. दुसरीकडे शेतीपिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे, अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात पुराच्या पाण्यातून बैलगाडी घेऊन जाताना मोठा अपघात झालेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, एक परिसर आहे जिथे एका रस्त्यावरुन पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. मात्र याच पुराच्या पाण्यातून रस्त्या ओलांडताना अनेक व्यक्ती दिसून येत आहे. त्यात एक बैलगाडीही रस्त्याच्या पलीकडे आहे जी जो मालक पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळात जो पुराच्या पाण्यातून बैलगाडी काढत असतो त्या क्षणीच बैलगाडी पुराच्या जोरदार प्रवाहातून वाहत्या पाण्यात पडते. दोन बैल आणि बैलगाडीवर असलेले सामान आणि बैलगाडीवरील व्यक्तीही पुराच्या पाण्यात पडतात. पुढे यांना वाचवण्यासाठी तिथे असलेले सर्व नागरिक मदतीसाठी जमलेले दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@saamtv'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर तब्बल ३ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज दिलेले आहेत. इतकेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेट्सबॉक्समध्ये लिहिले आहे की,'' काय मूर्ख लोक आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बैल वाचले हे बघून खूप छान आहेत वाटलं'' तर अनेकांनी संतापजनक तर अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral News: धावत्या ट्रेनमध्ये पर्स चोरताना रंगेहाथ पकडला; प्रवाशांनी लै बेक्कार चोपला, चोरट्याच्या फजितीचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com