Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : भावा तुझ्या ताकदीला सलाम! जीवाची बाजी लावली, जुगाड करून मित्राला पुरातून वाचवलं; थरारक VIDEO

Flood Rescue Viral Video : नदी, नाले, धबधबे अशा ठिकाणी व्यक्ती वाहून जात आहेत. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक तरुण वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

सध्या राज्यासह विविध ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मुसळधार पावसाने मुंबई सारख्या शहरांत अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलं आहे. काही ठिकाणी तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नदी, नाले, धबधबे अशा ठिकाणी व्यक्ती वाहून जात आहेत. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक तरुण वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मात्र त्याच्या मित्राने आपल्या जीवाची बाजी लावून या तरुणाला पुरासारख्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. जीवन आणि मृत्यू या दोघांमध्ये सुरु असलेला थरार एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण दुसऱ्या तरुणाला मोठ्या ताकदीने वाचवत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ पाहताना पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवणारा तरुण सुद्धा खाली कोसळेल अशी भीती वाटत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गावात मोठा पूर आला आहे. पुराच्या पाण्यात एका कालवा परिसरात पाणी वेगात वाहत चाललं आहे. या पाण्यामध्ये विविध वस्तूंसह एक तरुण सुद्धा सापडलाय. तरुण देखील पाण्यात वाहून चालला आहे. खाली वाहत असलेल्या पाण्यावर पुलासारखे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र ही जागा सुद्धा फार छोटी आहे. पाण्यात कोणतरी वाहत असल्याचं पाहून तरुण अगदी छोटी जागा असलेल्या पायरीवर उभा राहतो आणि आपल्या हातात एक सफेद रुमाल पकडून खाली लोंबकळतो.

त्याला पाहून पाण्यात वाहून चाललेला तरुण तो रुमाल पकडतो. त्याने रुमाल पकडताच पायरीवरील तरुण त्याला आपल्या एकाच हाताने वरती खेचून घेतो. त्याने हे धाडस केल्यावर हा तरुण देखील खाली पडतो की काय अशी भीती वाटत आहे. मात्र दोघेही सुखरुप पाण्यातून बाहेर पडतात. या तरुणाने स्वत:चा जीव सुरक्षित ठेवत वाहून जात असलेल्या तरुणाचे सुद्धा प्राण वाचवल्याने सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर @@Gulzar_sahab या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरजार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे? याची माहिती अद्याप समजलेली नाही. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या घरात लाईक्स आणि व्हुव्ज आले आहेत. तर नेटकऱ्यांनी यावर कमेंटमध्ये तरुणाचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT