Bus Stuck in Flood Water: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा LIVE VIDEO

Bus Stuck in Flood Water: नजीबाबाद येथून हरिद्वारला जाणारी रुपाडिया आगाराची डेपोची बस कोतवाली नदीत अडकून पडली.
Uttar Pradesh Bus Stuck Kota Wali River passenger rescue Shocking video
Uttar Pradesh Bus Stuck Kota Wali River passenger rescue Shocking videoSaam TV
Published On

Uttar Pradesh Bus Stuck Kota Wali River: सध्या देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अशातच उत्तरप्रदेशातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नजीबाबाद येथून हरिद्वारला जाणारी रुपाडिया आगाराची डेपोची बस कोतवाली नदीत अडकून पडली.

Uttar Pradesh Bus Stuck Kota Wali River passenger rescue Shocking video
Mumbai Rain Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण; अंधेरी सबवे बंद, मध्य रेल्वेची वाहतूकही उशीराने

या बसमधून जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत होते. पुराच्या पाण्यात बस अडकताच प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला. यातील काही प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. दरम्यान, या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

बसमध्ये असलेल्या प्रवाशांना जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुराच्या पाण्यात बस अडकून पडली आहे.

स्थानिक प्रशासनाकडून या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. एनडीआरएफच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पुराच्या पाण्यातून बाहेर पडताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील अनेक भागात पावसाची नोंद झाली आहे. बिजनौरमधील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. वाहतुकीवरही अनेक प्रकारे परिणाम होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com