Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : अर्रर्र! आता हेच पाहायचं राहिलं होतं; महिलेने थेट काजूकतलीचे बनवले भजी, पाहा VIDEO

Ruchika Jadhav

पावसाळा सुरू झाला आहे. पहिला पाऊस पडला की अनेक घरांमध्ये लगेचच खमंग तळलेली भजी आणि चहाचा सुगंध दरवळू लागतो. आता देखील सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने व्यक्ती विविध कांदा, वटाट, मिरची आणि असे अनेक प्रकारचे भजी बनवत आहेत. अशात सोशल मीडियावर एका अनोख्या भजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही भजी खाणं सोडून द्याल.

विविध चवीचे पदार्थ ट्राय करणे, चाखणे चांगली गोष्ट आहे. मात्र काही व्यक्तींनी कोणत्याही पदार्थात काहीही टाकून रेसिपी आणि पदार्थांची पूर्णता वाट लावली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने थेट गोड आणि आनेकांची फेवरेट असलेली काजूकतली मिठाईची भजी बनवली आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये जिरे आणि चवीनुसार मीठ मिक्स केलंय. त्यानंतर गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलीये आणि त्यामध्ये ती मस्त काजूकतलीचे भजी तळत आहे. महिलेने आपल्या खतरनाक रेसिपीचा व्हिडिओ देखील फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. काहींनी महिलेवर संताप व्यक्त केलाय. तर एकाने या महिलेला पागल हॉस्पिटलमध्ये पाठवा असं सुद्धा म्हटलं आहे. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ही माझी फेवरेट मिठाई होती. त्यासोबत हे काय केलं.

अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने थेट पाकात टम्म फुगलेले दोन दुलाबजाम कुसकरून गव्हाच्या पिठात भरलेत आणि त्याचे मस्त पराठे बनवून घेतले आहेत. आता हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT