Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मावशींचा बिजनेस जोमात, पब्लिक कोमात! चक्क धावत्या ट्रेनमध्ये थाटलं ब्युटी पार्लर; VIDEO पाहून डोकं धराल

Local Train Viral Video : सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.सध्या परत एकदा लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रवास आणि लोकल ट्रेन हे नातं कायमच आहे. प्रवास लांबच्या पल्ल्याचा असो वा जवळचा आपल्याला या प्रवासामधून अनेक गोष्टी नवीन शिकण्यास मिळतात किंवा अनुभवायला मिळतात. या प्रवासात अनेक प्रवाशांचे वादाचे रुपांतर आपण प्रचंड हाणामारीत झालेले पाहिले आहे तर कधी आनंदाचे क्षणही पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील काही महिलांचा गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या महिला लोकल ट्रेनमध्ये भर गर्दीत चक्क आयब्रोज करत आहेत. हा व्हिडिओ पाहिला नंतर तुम्हीही म्हणालं'ये नारी हैं कुछ भी कर सकती हैं'.

सोशल मीडियावर आपण अनेकदा लोकल ट्रेनमधील व्हिडिओ पाहतो. सध्या पावसाळा सुरु झालेला आहे. तर मुंबई(Mumbai) शहरासह उपनगरातील रेल्वे स्टेशनवरील प्रचंड प्रवाशांची गर्दी होत असते,त्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होतात. याच गर्दीमुळे महिला वर्गात भर गर्दीत वादा-वादी तर कधी हाणामारीही होत असते. तर कधी तरुणांची धावत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र या या महिलांच्या आयब्रोज करतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

पाहा व्हिडिओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) कुठला आहे हे समजू शकलेले नाही.पंरतू तुम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहू शकता, लोकल ट्रेनमधील एक महिलांचा कंपार्टमेंट दिसून येत आहे. यात महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दीही आहे. मात्र याच गर्दीत तुम्ही नीट पाहिले तर काही महिला खाली बसलेल्या आहेत,यात एक महिलाही दुसऱ्या महिलाचे आयब्रोज करत आहे. तर काही महिला स्टेशन येत असल्याने खाली उतरण्याच्या गडबडीत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्यात ट्रेनमधील (Train)एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @sheliganguly या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण पाच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला आहे. त्यानंतर व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स शिवाय मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' नक्की कुठली लोकल आहे,' तर अनेक यूजरने विविध गंमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT