व्हायरल न्यूज

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Video Viral : बॉसचा जीव वाचवण्यासाठी किडनी दान करणाऱ्या महिलेचीच रिकव्हरीसाठी घेतलेल्या सुट्टीवरून नोकरी गमावण्याची धक्कादायक घटना; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप उसळला

Saam Tv

बॉसला किडनी देऊन त्याचा जीव वाचवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यालाच रिकव्हरीसाठी सुट्टी घेतल्याचे कारण देत कामावरून काढून टाकलं. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

अवयवदान हे श्रेष्ठदान असतं हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. आपल्या एका अवयवानं एखाद्याला नवं आयुष्य मिळतं. यातच अनेकांना आयुष्याचं सार्थक झाल्याचं वाटतं. पण अमेरिकेतील एका महिलेला अवयवदान केल्यानं नोकरी गमवावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेनं तिच्या बॉसला किडनी दान केली होती. नवं आयुष्य देणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे उपकार या महिला बॉसने मानायला हवे होते. पण घडले उलटेच. नोकरीच्या ठिकाणी त्रास दिला जातोय आणि सुट्टी घेतली या कारणांमुळं या महिला कर्मचाऱ्याला बॉसने चक्क नोकरीवरून काढलं. या महिलेनं ही कहाणी सोशल मीडियावर सांगितली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकेतील ही घटना आहे. नोकरीवरून काढलेल्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. पण हा व्हिडिओ २०११ सालचा असल्याचे समोर आले आहे. तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेबी नावाची महिला एका कंपनीत नोकरीला होती. तिची बॉस ब्रुसिया हिची किडनी निकामी झाली. तेव्हा डेबीने तिला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता. पण तिची किडनी बॉसच्या किडनीला मॅच झाली नाही. त्यावरही तिने मार्ग शोधला. तिने पेयर्ड किडनी एक्स्चेंज प्रोग्राममध्ये भाग घेतला. तिला स्वतःची किडनी दान देऊन बॉसला मॅच होणारी किडनी मिळाली. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.

किडनी दान केल्यानंतर डेबीला रिकव्हर व्हायला वेळ लागत होता. तिला विश्रांतीची गरज होती. त्यासाठी तिने कामातून ब्रेक घेतला. पण तिच्या बॉसने तिच्यावर जराही दयामाया न दाखवता तिला कामावर बोलावले. तिची दुसऱ्या शहरात ट्रान्सफर करण्यात आली. दाखवलेल्या माणुसकीच्या बदल्यात तिच्या बॉसने तिच्याशी गैरवर्तन केले. हे सांगताना डेबीच्या डोळ्यांत अश्रू असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. डेबीने देखील यावर आवाज उठवला आणि कोर्टात धाव घेतली. कोर्टात हे प्रकरण जवळपास ४ वर्षे चालले. कोर्टाकडून दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि हे प्रकरण मिटवण्यात आले.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT